शाहूवाडी ग्रामस्थांचा निवडणूकीवर बहिष्काराचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडी ग्रामस्थांचा निवडणूकीवर बहिष्काराचा
शाहूवाडी ग्रामस्थांचा निवडणूकीवर बहिष्काराचा

शाहूवाडी ग्रामस्थांचा निवडणूकीवर बहिष्काराचा

sakal_logo
By

शाहूवाडी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

बैठकीत ग्रामस्थांचा निर्णय : नगरपंचायत मागणीसाठी आंदोलन

शाहूवाडी, ता. २१ ः शाहूवाडी या तालुक्याच्या ठिकाणी गावात नगरपंचायत व्हावी या मागणीसाठी शाहूवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करायचा नाही, अशीही भूमिका ग्रामस्‍थांनी घेतली. ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात बैठक झाली, त्या बैठकीत ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
शासनाने तालुका ठिकाणच्या गावांना नगरपंचायत देण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला. त्यानुसार शाहूवाडी गावाला नगरपंचायत मंजूर आहे; पण अद्याप त्यासाठी कार्यवाही झालेली नाही. उलट ग्रामपंचायत निवडणूक सध्या जाहीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रमावर यापूर्वीच बाहिष्कार टाकून कृती समितीच्या वतीने तसे जिल्हाधिकारी यांना रितसर कळविले आहे. यापुढेही आता कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करायचा नाही. मतदान करायचे नाही. सर्वच निवडणूक कार्यक्रमावर बाहिष्कार टाकायचा निर्णय सर्वांनी घेतला. नगरपंचायत झाली तरच येथील पाणी, रस्ते यांसह सर्वच विकासकामांना गती मिळेल, विकास होईल त्यासाठी नगरपंचायत झालीच पाहिजे असा सर्वांचा संतापाचा सूर बैठकीत होता.
या वेळी कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पोवार, माजी सरपंच वैशाली लाळे, उपसरपंच दीपक जाधव, यशवंत चावरे, हणमंत कवळे, शंकर चावरे, चंद्रकांत म्हापसेकर, सुहास लाड, अमोल घाडगे, बजरंग दिंडे, सागर चावरे, सुरेश पाटील, अमर शिंदे, अशोक सातपुते, संभाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.