मलकापूरात सेनेचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलकापूरात सेनेचे आंदोलन
मलकापूरात सेनेचे आंदोलन

मलकापूरात सेनेचे आंदोलन

sakal_logo
By

B01796
मलकापूर ःयेथे आंदोलन करताना शिवसैनिक.

मलकापूरला कोश्‍यारींचा निषेध
मलकापूर, ः राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा निषेध करत ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने येथे जोडे मारो आंदोलन केले. शिवसेना जिल्हाउपप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापू- रत्नागिरी महामार्गावर आंदोलन झाले. राज्यपाल कोश्‍यारी व त्रिवेदी यांचा निषेध करत प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी नामदेव गिरी, दत्ता पवार, दिनकर लोहार, अनिल पाटील, जयसिंग डाकवे, निवास कदम, योगेश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात माजी सभापती विजय खोत, दिगंबर कुंभार, बाबूराव चांदणे, ओंकार बेंडके, अलका भालेकर, पूनम भोसले, लक्ष्मी तडवळेकर, विजय लाटकर सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी शाहूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे व सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.