शाहूवाडी तालुका ग्रामपंचायत निवडणूक वार्तापत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडी तालुका   ग्रामपंचायत निवडणूक वार्तापत्र
शाहूवाडी तालुका ग्रामपंचायत निवडणूक वार्तापत्र

शाहूवाडी तालुका ग्रामपंचायत निवडणूक वार्तापत्र

sakal_logo
By

शाहूवाडी तालुका वार्तापत्र शनिवारी (ता२६) ला पानावर घेणे, प्रसिध्द रविवारी (ता२७)

सरकारनामा….
शाहूवाडी
शाम पाटील

उमेदवारांसह नेत्यांची प्रतिष्ठापणाला
भाजपालाही सत्तेचे वेध ः गोकुळ, जिल्हा बँकेतील यशापयशाचा परिणाम


शाहूवाडी, ता.२३ : (शाम पाटील)- राजकीयदृष्टया अतिसंवेदनशील, मोठी लोकसंख्या असणारी व आजी-माजी लोकप्रतिनिधींची गावे लक्षवेधी ठरणारा हा शाहूवाडी तालुका होय. तालुक्यात सध्या ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदारपणे सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्या अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती बहुतांश ठिकाणी होणार असलेचे प्राथमिक चित्र आहे. त्या दृष्टीने गावागावांत मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने त्यात चुरशीची अधिक भर पडली आहे. सरपंचपदासह ग्रामपंचायत आपल्याच गटाकडे खेचण्यासाठी गावागावांत फेर जुळवाजुळव करण्यात कारभारी मंडळी गुंतले आहेत. भागवार बैठका सुरू आहेत. वरिष्ठ नेत्यांनीही स्वत:ची प्रतिष्ठापणाला लागली आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने या निवडणुका महत्त्वपूर्ण ठरत आहेत. ज्या गटाकडे ग्रामपंचायती जास्त त्यांचा मार्ग सुखकर असा संकेत ठरलेला आहे.
तालुक्यात आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा बॅंक संचालक रणवीर गायकवाड, गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड असे राजकीय गट आहेत. त्यामध्ये कोरे-गायकवाड आघाडीविरोधात पाटील-गायकवाड आघाडी अशाच लढती तालुका पातळीवरील निवडणुकांत होताना दिसतात, पण ग्रामपंचायतींत मात्र गावपातळीवरील सोयीच्या समिश्र आघाड्या आकारास येतात, असेच चित्र आहे. यावेळीही तशा आघाड्या होत आहेत. जिल्हा बँक व गोकुळ दूध संघ येथे दोन्ही गायकवाड गटांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्याने हे दोन्ही गट यावेळी जोमाने सक्रिय झाले आहेत. यातून वेगळी राजकीय समीकरणे उदयास येऊ शकतात. मलकापूर नगरपरिषदेत सत्ता भोगलेल्या भाजपलाही ग्रामपंचायतीमधील सत्तेचे वेध लागले आहेत. काही गावांत भाजपने त्यासाठी बैठका घेऊन व्यूहरचना आखली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात झालेल्या सत्तांतरांचा परिणाम तालुक्यात अद्यापही कोठे दिसत नाही, मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत तो दिसणार का, याबाबत मतदारांत उत्सुकता आहे.

सरूड, बांबवडे, भेडसगाव, कडवे, साळशी, पिशवी, कोतोली, करुंगळे, कापशी या लोकप्रतिनिधींच्या गावातील लढती विशेष लक्षवेधी ठरणार आहेत, तर काही गावांत राजकीय गटतटांना महत्त्व न देता गावच्या विकासाचे केंद्र असणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी बिनविरोध करण्याचे प्रयत्न ज्येष्ठ ग्रामस्थांतून सुरू आहेत. शाहूवाडी या तालुका ठिकाणच्या गावात नगरपंचायत होण्यासाठी ग्रामस्थांनी निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार घातण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

पॉईंटर-
- सरूड, बांबवडे, भेडसगाव, कडवे, साळशी, पिशवी, कापशी येथे ‘हाय होल्टेज’ लढती
- काही ठिकाणी गावपातळीवर गट-तट सोडून बिनविरोधासाठी प्रयत्न
- शाहूवाडी तालुका ठिकाणच्या गावात नगरपंचायतसाठी निवडणुकीवर बहिष्कार
- भाजपाची यावेळी ग्रामपंचायतसाठी चाचपणी
- जिल्हा बँक व गोकुळच्या निवडणुकीतील यशापयशाचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकांत उमटणार

निवडणूक लागलेली गावे-
करंजोशी, बहिरेवाडी, सांबू, बजागेवाडी, उखळू, आंबर्डे, भाडळे, घुंगूर, करंजफेण, माळापुडे, पिशवी, उचत, वरेवाडी, निळे, आरूळ, चरण, मरळे, हारुगडेवाडी, करुंगळे, कापशी, कोपार्डे, कोळगाव, खेडे, लोळणे, येलूर, परखंदळे, शिराळे तर्फ वारुण, शिवारे, टेकोली, विरळे पळसवडे, कडवे, येळवण जुगाई, खोतवाडी, अमेणी, भेडसगाव, डोणोली, गोगवे, माणगाव, कातळेवाडी, रेठरे, सरूड, साळशी, शाहूवाडी (चनवाड), तुरूकवाडी, उदगिरी, येळाणे, बांबवडे, कोतोली, खुटाळवाडी.