शाहूवाडी तालुक्यातच चुरशीने मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडी तालुक्यातच चुरशीने मतदान
शाहूवाडी तालुक्यातच चुरशीने मतदान

शाहूवाडी तालुक्यातच चुरशीने मतदान

sakal_logo
By

शाहूवाडी
-
01836
कडवे ः येथील मतदान केंद्रावर१०१ वर्षे वयाच्या मनुबाई खोत यांची गाडीतच ओळख पटवताना मतदान अधिकारी.

उमेदवारांचे चिन्ह शोधताना गोंधळ

शाहूवाडी, ता.१८ ः तालुक्यात ४३ ग्रामपंचायतीसाठी आज सर्वच गावांत अत्यंत चुरशीने मतदान झाले. सरपंचपदाच्या १०९ व सदस्य पदाच्या ७४२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. काही ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सकाळी तर काही ठिकाणी दुपारी मतदारांची गर्दी होती. किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले.
कोपोर्डेत मोठी चुरस असल्याने सकाळी दहा वाजता पन्नास टक्के मतदान झाले होते. वृद्ध मतदाराचे मतदान कोणी करावे यावरून सकाळीच येथे दोन गटात वादावादी झाली. उचत येथील मतदान केंद्रांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या वीस असलेने तेथे दोन मतदान मशीन होते. शिवाय प्रत्येक उमेदवाराचे निवडणूक चिन्ह वेगळे. त्यामुळे उमेदवारांचे चिन्ह शोधताना मतदारांचा गोंधळ होत होता. वृध्द आणि निरक्षर लोकांना समजावतांना तर मतदान अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधिची दमछाक होत होती. आधार कार्ड ओळखपत्र म्हणून ग्राह्य न धरलेने काही मतदान केंद्रांवरही वादावादी झाली.
भेडसगाव, कापशी, बांबवडे, साळशी, पिशवी, कडवे येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदारांची गर्दी जादा होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुक्यात ७७ टक्के मतदान झाले होते.
नगरपंचायत व्हावी यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार असल्याने तालुका ठिकाणच्या शाहूवाडीत तर बिनविरोध निवडणुका झाल्याने करूंगळे, भैरेवाडी, सांबू, कोळगाव, उदगिरीत निरव शांतता होती. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसिलदार गुरू बिराजदार, निवासी नायब तहसीलदार रविंद्र मोरे, पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांनी चोख व्यवस्था ठेवली होती.

परगावच्या मतदारांना आणण्यासाठी ट्रॅव्हल्स
काही मतदान केंद्रांवरही वादावादी
किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान
कोट
मी नवमतदार
नवमतदार म्हणून मतदार करताना वेगळा आनंद वाटला असे त्याने सांगितले. विजयी लोकप्रतिनिधीनी गावच्या विकासाचे धोरण राबवावे
- ओंकार वाघमारे, येलूर