शाहूवाडीत सरपंच आठ तर सदस्यसाठी दहा जणांची अनामत जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडीत सरपंच आठ तर सदस्यसाठी दहा जणांची अनामत जप्त
शाहूवाडीत सरपंच आठ तर सदस्यसाठी दहा जणांची अनामत जप्त

शाहूवाडीत सरपंच आठ तर सदस्यसाठी दहा जणांची अनामत जप्त

sakal_logo
By

सरपंचपदाच्या आठ, सदस्यपदाच्या १०
उमेदवारांचे अनामत जप्त
शाहूवाडी तालुका; उचतमध्ये ‘नोटा’ला ८३ मते
शाहूवाडी, ता. २४ : शाहूवाडी तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या. त्यामध्ये गावचा प्रमुख कारभारी (सरपंच) होण्यासाठी आपले भाग्य अजमावणाऱ्या आठ गावातील आठ उमेदवारांची, तर प्रभाग सदस्य होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या सात गावातील १० जणांची अनामत रक्कम जप्त झाली. मतदारांसमोर त्यांचा प्रभाव पडला नाही. मतदारांनी त्यांना थेट नापसंती दिली. एकाही उमेदवाराला पसंती न देण्याचे (नोटा) प्रमाण उचत या छोटया गावात सर्वाधिक ८३ असे आहे.
शाहूवाडी तालुक्यात पाक्षिय पातळीपेक्षा स्थानिक गाव पातळीवरील गटातटाच्या इर्षेत अधिक मतदान झाले. त्यात अनेक उमेदवारांना त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जादा मतदान झाले. मतदार ग्रामस्थांनी त्यांना प्रथम क्रमांकाने मते दिली. मात्र गोगावे, खेडे, पिशवी, साळशी, तुरूकवाडी,उखळू,हारुगडेवाडी,बांबवडे या गावांत सरपंचपदासाठी झालेल्या लढतीत आठ जणांची अनामत जप्त झाली.सरपंच जनतेतून असतानाही गोगवे येथे एकाला केवळ १६,साळशीत ३५,पिशवीत ४८, तुरुकवाडीत ४०, हारूगडेवाडीत ६४, बांबवडेत ६९, खेडेत ७६, उखळूत ७९ असे अत्यल्प मतदान झाले.
ग्रामपंचायत सदस्य पदासाठी झालेल्या लढतीत रेठरे, उचत, गोगवे, शिवारे, विरळे, येळवण जुगाई, करंजोशी या सात गावांतील दहा सदस्यांची अनामत जप्त झाली. उचत गावात एका सदस्याला फक्त सात मतदान झाले. गोगवेत १८, शिवारे १३, विरळे २८, येळवण जुगाई ३६, तर रेठरे येथे तिघांना २७, ३१, ३८ व करंजोशी येथे ३९ व ४३ असे अत्यल्प मतदान झाले.
---------------
चौकट
नोटाचे प्रमाण तुलनेत अधिक
नोटाला बहूतांश ठिकाणी खूपच कमी मतदान झाले. मात्र येथे उचत ८३, टेकोली ४८, पिशवी ३७ असे नोटाला मतदान झाले. येथील गावपातळीवरील मतदानाची आकडेवारी पाहता नोटाचे प्रमाण अधिक वाटते.