Tue, Feb 7, 2023

मलकापूर नगरपालिकेस ५ कोटीचे विशेष अनुदान
मलकापूर नगरपालिकेस ५ कोटीचे विशेष अनुदान
Published on : 28 December 2022, 6:19 am
मलकापूरला ५ कोटींचा निधी मंजूर
मलकापूर : शासनाच्या वैशिष्टयपूर्ण विशेष अनुदानातून विशेष बाब म्हणून नगरपालिकेस ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी आमदार डॉ. विनय कोरे यांनी प्रयत्न केल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘पालिकेस विकासकामे करणेसाठी निधी मिळावा यासाठी आमदार कोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी केली होती. या निधीतून जुने मंगलधाम येथे शॉपिंग सेंटर बांधणे (३ कोटी ) व पालिका जुनी इमारत येथे शॉपिंग सेंटर बांधणे (२ कोटी) यासाठी वापरावा असे निर्देश नगरविकास मंत्रालयाने दिले आहेत. याकामी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांचेही सहकार्य लाभले.’