
कडवे ( ता. शाहूवाडी ) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरूणास अटक
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
शाहूवाडी ः नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शाहूवाडी तालुक्यातील एका गावात घडला. संशयित नराधमाला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिली. संशयितही अल्पवयीन आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः अल्पवयीन मुलीला राहत्या घरी गाठून संशयिताने मे २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी घाबरली होती. दरम्यान, संबंधित पीडितेला दिवस गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात वर्दी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (ता. ३०) संशयिताला कोल्हापूर येथील जिल्हा विशेष (पोक्सो) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयिताची बालसुधारगृहात रवानगी केली.