
शाहूवाडीत ४८ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडी पार
‘शाहूवाडी’त ४८ ठिकाणी
उपसरपंचपद निवडी
शाहूवाडी, ता. ११ - तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडी आज झाल्या. भेडसगाव वगळता सर्वच ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. नूतन सरपंचांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या. सरपंचांना असणाऱ्या दोन मतांच्या अधिकारामुळे भेडसगांव येथे सत्ताधारी गटाचा उपसरपंच झाला. तालुक्यात ४९ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध तर चनवाड शाहूवाडी ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. भेडसगावला माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील गटाकडे सरपंचासह सहा तर विरोधी दादासो पाटील गटाकडे सहा अशी समान सदस्यसंख्या होती. दोन्ही गटांकडून उपसरपंचपदासाठी अर्ज आले. मात्र सरपंचांना दोन मतांचा अधिकार असल्याने सत्ताधारी गटाच्या शुभांगी साळुंखे उपसरपंच झाल्या.