Sun, May 28, 2023

मलकापूर नगर परिषद कर्मचाऱ्यांचे संपाबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
मलकापूर नगर परिषद कर्मचाऱ्यांचे संपाबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
Published on : 9 March 2023, 3:26 am
01950
मलकापूर नगरपरिषद
कर्मचारी १४ पासून संपावर
मलकापूर ः राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून येथील नगरपरिषद कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्याबाबतचे लेखी निवेदन नगरपरिषद कर्मचारी संघटनेतर्फे मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमर पाटील, उपाध्यक्ष रवी कांबळे, ऋषीकेश पाटणकर, महेश गावखंडकर, प्रसाद हर्डीकर, गणेश लगारे, दीपक सणगर, विठ्ठल वारकरी उपस्थित होते.