मलकापूर नगरपालिकेच्या वतीने ६२ महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलकापूर नगरपालिकेच्या वतीने ६२ महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण
मलकापूर नगरपालिकेच्या वतीने ६२ महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण

मलकापूर नगरपालिकेच्या वतीने ६२ महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण

sakal_logo
By

मलकापूरला ६२ महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण
मलकापूर ः महिलांनी व्यावसायिकदृष्टया सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे या उद्देशाने पालिकेतर्फे येथील ६२ महिला व मुलींना मोफत संगणक प्रशिक्षण देणेत येत आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘महिला व बालकल्याण विकास योजनेअंतर्गत टॅली ईआरपीजी व एमएस ऑफिसबाबतचे संगणक ज्ञान देणेत येत आहे. त्यासाठी ५ लाख ५० हजारांचा निधी मिळाला आहे. अडीच महिन्यांचे प्रशिक्षण आहे. ६२ महिला व मुली सहभागी झाल्या आहेत. प्रशिक्षणासाठी लागणारे रजिस्टर व अन्य साहित्यही महिलांना पुरवणेत आले आहे. यातून महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच सामाजिक व अभिव्यक्ती सक्षमीकरण होणार आहे.’ प्रशिक्षणासाठी ए. एम. बागवान, व्ही. एम. तवर, महेश गावखडकर परिश्रम घेत आहेत.