शाहूवाडी तहसिलवर २१ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

शाहूवाडी तहसिलवर २१ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

मलकापूरला २१ ला शेतकऱ्यांचा मोर्चा
शाहूवाडी ः शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता सरकारने तातडीने करावी यासाठी मंगळवारी (ता. २१) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर यांनी केले. ते म्हणाले, ‘शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी, जंगली जनावरांच्या हल्ल्यातील शेतकऱ्यांना २० लाख भरपाई मिळावी, पाळीव जनावरांवरील हल्ल्याचे दीडपट नुकसान मिळावे, महावितरणने ३७ टक्केची वाढ रद्द करावी, महापूरकाळात नादुरुस्त डीपी सुरू करून मिळावी, गॅस दरवाढ मागे घ्यावी, रेशनकार्ड युनिटप्रमाणे धान्य मिळावे आदी मागण्यांसाठी मोर्चा होणार आहे. मोर्चाची सुरुवात मलकापूर येथील विठ्ठल मंदिर येथून सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन म्हाऊटकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com