मलकापूर पालिका प्रशासन नळ कनेक्शन तोडणे व जप्तीची कारवाई करणार

मलकापूर पालिका प्रशासन नळ कनेक्शन तोडणे व जप्तीची कारवाई करणार

मलकापूरला घरफाळ्याप्रश्‍नी
१२० जणांना नोटिसा
वसुलीसाठी आजपासून धडक मोहीम
मलकापूर, ता. २६ : थकीत घरफाळा व पाणीपट्टी कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांची नळजोडणी तोडणेसाठी व मालमत्ता जप्तीसाठी पालिका प्रशासन सोमवार (ता. २७)पासून विशेष धडक मोहीम राबवणार असल्याची माहिती पालिकेच्या वसुली विभागातून देण्यात आली. १२० जणांना कारवाईच्या नोटीसा पालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
नगरपालिकेने चालू आर्थिक वर्षातील घरफाळा व पाणीपट्टीची वसुलीची बिले मालमत्ताधारकांना दोन टप्प्यांत दिली. त्यानंतर वारंवार कर भरणेसाठी आवाहनही केले. तरीही काही मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही. काहींची तर लाखो रुपयांची कर थकबाकी आहे. मात्र त्यांनी पालिका प्रशासनास दाद दिलेली नाही. अशा एकूण १२० थकीत मालमत्ताधारकांना पालिका प्रशासनाने १५१ ची नोटीस पाठवून कारवाई करणार असल्याचे कळविले आहे. या कारवाईअंतर्गत सोमवारपासून संबंधितांची नळजोडणी तोडणे व मालमत्ता जप्ती करणेची विशेष धडक मोहीम राबविणेत येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने विभागवार पाच वसुली पथके नेमली आहेत.
पालिकेला घरफाळा व पाणीपट्टीसह इतर करापोटी एकूण १ कोटी २१ लाखांचा कर मिळतो. प्रतिवर्षी वसुलीही चांगली होते. नागरिक कर भरणेस सहकार्य करतात. मात्र २०१७-१८ मध्ये चतुर्थ वार्षिक कर आकारणी झाली.त्यामूळे वाढीव कर आकारणी झाली आणि कोरोनाने भर घातली. त्यातून थकबाकी वाढत गेली. पाच वर्षे वाढती थकीत करवसुली करताना पालिका प्रशासन अक्षरशः मोटाकुटीस आले आहे. त्यामुळे करवसुलीची मोहीम राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोट-
सध्या ५५ टक्के करवसुली झाली आहे. यावेळी १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी नियोजन केले आहे. १२० थकबाकीदारांना नोटीसा काढल्या आहेत. वसुलीसाठी सोमवारपासून पाच पथकांद्वारे नळजोडणी तोडणेची व जप्तीची धडक मोहीम राबविणार आहे.
- हृषीकेश पाटणकर, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, मलकापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com