शाहूवाडीत गाव विकासआराखडा आढावा बैठक

शाहूवाडीत गाव विकासआराखडा आढावा बैठक

02055

शाहूवाडी ः येथील पंचायत समिती सभागृहात गाव विकास आराखडा आढावा बैठकीत बोलताना आमदार विनय कोरे.
...

गावातील प्रत्यक्ष अडचणी
पाहून विकास आराखडा व्हावा

आमदार विनय कोरे ः शाहूवाडी पंचायत समितीत नियोजन आढावा बैठक

शाहूवाडी, ता.८ः ‘गाव विकास आराखडा गावातील प्रत्यक्ष अडचणी पाहून व्हावा. स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचा त्यात मोठा सहभाग असावा,’ असे आवाहन आमदार विनय कोरे यांनी केले.
येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील गावांचा पंचवार्षिक विकास आराखडा व नियोजन याबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार कोरे म्हणाले, ‘गावागावांत रस्ते आहेत. पण काही रस्ते, पाणंदी यांच्या नोंदी नाहीत. त्यामुळे निधी असतानाही तेथे काम करण्यासाठी निधी देता येत नाही. धनगर वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांची अवस्था तर फारच वाईट आहे. प्रत्यक्ष असणारे पण नोंद नसणाऱ्या रस्त्यांची, पाणंदीची माहिती आराखड्यात भरा. दलित वस्तीमधील कामे व पाणी पुरवठा कामे विकास आराखड्यात धरा. संजय गांधी योजनेतील लाभार्थी शाहूवाडी तालुक्यात केवळ तेराशे आहेत. पन्हाळ्यात १३ हजार लाभार्थी आहेत. शासकिय योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावेत.’
गटविकास अधिकारी रामदास बधे यांनी प्रास्ताविक केले. देवरूख येथील वनश्री तांबे यांनी यावेळी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यासाठी २५ हजार झाडे मोफत देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आपली मागणी ग्रामपंचायतींनी नोंदवावी, असे आवाहन केले.
यावेळी ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत, सुभाषराव इनामदार, महादेव पाटील, विष्णू पाटील, बाळासाहेब गद्रे, रंगराव खोपडे आदी उपस्थित होते.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com