Sat, Sept 30, 2023

गणेशनगर ( शाहूवाडी ) येथे चोरी१ लाख ९० हजाराचा मुद्देमाल लंपास
गणेशनगर ( शाहूवाडी ) येथे चोरी१ लाख ९० हजाराचा मुद्देमाल लंपास
Published on : 16 May 2023, 7:42 am
शाहूवाडी येथे १ लाख ९० हजारांची चोरी
शाहूवाडीः गणेशनगर (शाहूवाडी) येथील मोहसीन मुलाणी यांच्या राहत्या घरी खिडकीतून प्रवेश करून चोरट्याने १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सोमवारी रात्री ही चोरी झाली. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मोहसीन मुलाणी (रा.उचत) यांचे शाहूवाडी येथे सायकल दुरुस्तीची दुकान आहे. ते शाहूवाडी पैकी गणेसनगर येथे आनंदा पारळे यांच्या घरी भाड्याने राहतात. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीची जाळी उचकटून घरात प्रवेश केला. तिजोरीच्या लॉकरमधील रोख रक्कम १ लाख ५२ हजार, सोन्याचे ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने, २ हजार रुपये किंमतीची चांदीची चेन, १ हजार ५०० रुपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अधिक तपास शाहूवाडी पोलिस करत आहेत .