शाहूवाडी गाव तलाव मालिका भाग २ ( भेडसगावचा ऐतिहासिक तलाव ) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडी गाव तलाव मालिका भाग २ ( भेडसगावचा ऐतिहासिक तलाव )
शाहूवाडी गाव तलाव मालिका भाग २ ( भेडसगावचा ऐतिहासिक तलाव )

शाहूवाडी गाव तलाव मालिका भाग २ ( भेडसगावचा ऐतिहासिक तलाव )

sakal_logo
By

02072
भेडसगांव (ता.शाहूवाडी) ः येथील भवानी गावतलाव.


मालिका लोगो ः कालच्या टुडे २ वरून घेणे

पाण्याचे नवे स्त्रोत आले,
गावतलाव दुर्लक्षीत राहिले ः भाग२

बलिदानाचं प्रतीक, भेडसगांवचा भवानी तलाव!
३५० वर्षापूर्वीचा उलगडा; ग्रामस्थांनी जोपासले भावानिक नातं

शाम पाटील ः सकाळ वृत्तसेवा
शाहूवाडी, ता.१९ ः सुमारे साडेतीनशे वर्षीपूर्वीचा ऐतिहासिक शाहूकालीन असणारा व ग्रामस्थांच्या श्रमदानातून खुदाई करण्यात आलेला भेडसगांव (ता. शाहूवाडी) येथील भवानी तलाव आजही गावचे वैभव आहे. १६७० मध्ये भयाण दुष्काळात या तलावाचे खोदकाम झाले. सुमारे २०० मिटर व्यासाचा भव्य तलाव गावच्या मध्यभागी तयार झाला. मात्र, पाणी लागले नव्हते. त्यावेळी गावच्या चिमाणी पाटील यांची सून हौसाबाई पाटील ह्या पोटच्या तान्हूल्या बाळासह सती गेल्या आणि तलावाला पाझर फुटला, अशी अख्यायिका आहे. त्याचा साक्षीदार तो ‘सतीचा खांब’ आहे. गावतलाव व ग्रामस्थाच वेगळं भावानिक नात आजही जोपासले आहे.
गावच्या भवानी तलावासाठी हौसाबाई पाटील यांच्या बालिदानावर आधारित ज्येष्ठ साहित्यीक प्रा.चंद्रकुमार नलगे यांनी १९९० च्या दशकात''अंगाई'' या चित्रपटाचे कथानक लिहिले. संपूर्ण महाराष्ट्रभर चित्रपट गाजला. त्यानंतर अनेकांनी या तलावाला भेटी दिल्या. तलावाच्या मध्यभागी दिपस्तंभासारखा लाकडी खांब आहे. त्यावर १६७० साल नमुद आहे. तलावातला गाळ काढला अन् ग्रामस्थांना ३५० वर्षाच्या अख्यायिकेतील तो चमत्कारीक खांब सापडला. खांबाखाली लाकडी चबुतराही असल्याचे बोलले जाते.
दुष्काळात पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून गावासाठी संजीवनी ठरलेला भवानी तलाव कालोघात मात्र गाळाने भरलेला, शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी असणारा झाला होता. आठ वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी पाटील यांच्या पुढाकाराने तलावातील प्रदुषीत पाणी व गाळ काढला. निसर्गप्रेमी ग्रामस्थ ज्ञानदेव शेळके व मित्रपरिवाराने तलावाकाठी वृक्षारोपण केले. त्या वृक्षारोपनाने तलावाचे सौंदर्य खुलले आहे.
सध्या गुरांना पाणी व धुणे, कपडे स्वच्छतेसाठी तलावाचा अधिक उपयोग होतो आहे. जेष्ठ नागरिकांचा विरूंगळा पॉईंटही तलाव परिसरच आहे. तलावात पश्चिम व दक्षिण बाजुंच्या नात्यांचे सांडपाणी थेट मिसळत आहे. ते इतरत्र वळवणेसाठी प्रयत्न व्हायला हवेत. गावचा ऐतिहासिक ठेवा म्हणून तलावाची देखभाल वारंवार होणे गरजेचे आहे.
तलावातील गाळात असलेला सुमारे १२ फूट उंचीचा लाकडी खांब ग्रामस्थांना गाळ काढताना आढळला. त्यावर काही अक्षरेही आहेत. बलिदान खांब म्हणून एक वेगळी भावना त्याबाबत ग्रामस्थातून व्यक्त होत आहेत.
-------
कोट
तलावात उत्तरेकडून मिसळत असणारे सांडपाणी महिनाभरापूर्वीच दहा पाईप टाकून तलावाखालील बाजूस वळविले आहे. पश्चिम व दक्षिण भागातील सांडपाणी कांही प्रमाणात तलावात जाते. तेथे कठिण दगड असलेने काम करता आलेले नाही. ते करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तलावात असणाऱ्या आडाचे बांधकाम पूर्ण केले आहे.
- तेजस्विनी पाटील, सरपंच, भेडसगाव

कोट
ऐतिहासिक व गाववैभव असणाऱ्या तलावाचे संवर्धन व सुशोभिकरण करण्यासाठी साडेचार कोटीचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला आहे. तो मंजूर होण्यासाठी पाठपूरावा सुरू आहे. तलाव परिसरात पर्यटनस्थळ व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
-हंबीरराव पाटील, माजी जि. प. सदस्य भेडसगाव.