मंजूर १५ पदापैकी १० पदे रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंजूर १५ पदापैकी १० पदे रिक्त
मंजूर १५ पदापैकी १० पदे रिक्त

मंजूर १५ पदापैकी १० पदे रिक्त

sakal_logo
By

मंजूर १५ पदापैकी १० पदे रिक्त
शाहूवाडी भूमिअभिलेख कार्यालयातील चित्र; शेतकऱ्यांचे हेलपाटे संपेनात

शाम पाटील : सकाळ वृत्तसेवा
शाहूवाडी, ता. २३ : येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. कार्यालयातील १५ मंजूर पदापैकी कार्यालयाचे प्रमुख उपअधीक्षक पदासह १० पदे रिक्त आहेत. एकजण सहा माहिन्याच्या दीर्घ रजेवर आहेत. केवळ तीन लिपिक व एक शिपाई प्रत्यक्ष कामावर आहेत. परिणामी पावणे चारशे जमीन मोजणीची प्रकरणे पडून आहेत. शेतकरी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. निमताणदार कार्यालयाचे प्रमुख म्हणून पद सांभाळत आहेत. कामकाजावरील नियंत्रण सुटल्याची येथे स्थिती आहे.
येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक, मुख्यालय सहाय्यक, निमतानदार, लघू लिपिक, कनिष्ठ लिपिक, दुरुस्तीदार, प्रतिलिपिक, छाननीदार, अभिलेखापाल, दप्तरबंद प्रत्येकी एक, शिपाई तीन व भूकरमापक दोन अशी एकूण पंधरापदे मंजूर आहेत. त्यापैकी कार्यालय प्रमुख उपअधीक्षक, मुख्यालय सहायक, लघू लिपिक, कनिष्ठ लिपिक, दुरुस्तीदार, छाननीदार, अभिलेखापाल, भूकरमापक ही महत्त्‍वाची पदे व दोन शिपाईपदे रिक्त आहेत. निमतानदार, प्रतिलिपिक, दप्तरबंद व एक शिपाई प्रत्यक्ष कामकाज पहात आहेत.
प्रत्यक्ष जमीन मोजणीचे काम करणारे दोन भूकरमापक आहेत. त्यापैकी एक रिक्त आहे. तर दुसरे सहामहिन्यांच्या दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे पावणे चारशे जमीन मोजणी प्रकरणे धूळ खात पडून आहेत. परिणामी मोजणीची शासकीय फी भरूनही शेतकऱ्यांना मोजणी प्रकरणी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी जमीन मोजण्या होणे आवश्यक आहेत. पण, कर्मचारीच नसल्याने मोठी अडचण आहे. कार्यालयात गेल्यावर मोजणी करणारेच नाहीत, तर आम्ही काय करू यांसह नंतर या, तुमची कागदपत्रे सापडत नाहीत अशी उत्तरे ऐकावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या प्रतिनियुक्तीवर तात्पुरते दोन भूकरमापक आहेत. मात्र, विस्तीर्ण आणि मोठ्या डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे जलदकामात अनेक अडचणी आहेत.
---
कोट
भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचारी संख्या खूपच कमी आहे. ही वस्तूस्थिती आहे. गेल्या आठवडयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयास भेट दिली आहे. येत्या आठ दहा दिवसात काही कर्मचारी मिळतील.
- नंदकुमार शेळके; निमताणदार, कार्यालय प्रमुख