
आंबर्डे ( ता. शाहूवाडी ) येथील तलावात तरुणाचा बुडून मृत्यू
आंबर्डेत तलावात तरुणाचा बुडून मृत्यू
शाहूवाडीः आंबर्डे पैकी रणवरेवाडी (ता.शाहूवाडी) येथील तलावात मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेल्या तुषार गजानन बेर्डे (वय २२, रा. बेर्डेवाडी, देवरुख जि.रत्नागिरी) याचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबवली, पण मृतदेह सापडला नाही. उद्या सकाळी पुन्हा शोध मोहिम राबवली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तुषार बेर्डे हा मुंबई येथे खासगी नोकरीस होता. तो आणि त्याचे दोन मित्र दोन दिवसांपूर्वी आंबर्डे येथे आपल्या मित्रांकडे सुटीनिमित्त राहण्यास आले होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हे सर्वजण आंबर्डे तलावात अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी पोहताना तुषार खोल पाण्यात गेला. तेथून त्याला परत येता आले नाही. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.