Sun, Sept 24, 2023

गोगवे ( ता.शाहूवाडी ) येथे अपघात एक जण ठार
गोगवे ( ता.शाहूवाडी ) येथे अपघात एक जण ठार
Published on : 2 June 2023, 6:22 am
06679
...
ट्रकच्या धडकेत गोगवेचा तरुण ठार
शाहूवाडीः कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर गोगवे (ता.शाहूवाडी) येथे ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार जितेंद्र भगवान पाटील (वय २३, रा. गोगवे ता.शाहूवाडी) हा जागीच ठार झाला. शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास ट्रक चालक राजू अब्दूल शेख (वय ३२,रा. श्रीरामनगर, शिये ता.करवीर) हा ट्रक घेवून कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जात होता. त्यावेळी ओव्हरटेक करताना मोटारसायकलला ट्रकची जोरात धडक बसली. त्यात जितेंद्र पाटील याच्या डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.