आंबर्डे (ता. शाहूवाडी ) येथील तलावात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

आंबर्डे (ता. शाहूवाडी ) येथील तलावात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

आंबर्डेतील तलावात बुडालेल्या
युवकाचा मृतदेह सापडला

शाहूवाडी, ता.३ ः आंबर्डे (ता. शाहूवाडी) येथील तलावात शुक्रवारी सकाळी बुडालेल्या तुषार गजानन बेर्डे (वय २२, रा. बेर्डेवाडी देवरूख जि. रत्नागिरी) याचा मृतदेह आज दुपारी दीडच्या सुमारास सापडला. तब्बल २७ तासानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने मृतदेह शोधला.
मृत तुषार बेर्डे हा मुंबईत खासगी नोकरीस होता. सुटीनिमित्त तो आपल्या कोकणातील मित्रांसमवेत आंबर्डे येथील मित्राकडे तीन दिवसांपूर्वी आला होता. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चौघे मित्र तलावात अंघोळीला गेले. तलावात पोहून झाल्यानंतर सर्वजण काठावर आले. मात्र तुषार पुन्हा पोहण्यास पाण्यात उतरला. पोहत पोहत तो तलावात आतपर्यंत गेला, मात्र दमछाक झाल्याने खोल पाण्यात बुडाला. मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला बोलवण्यात आले. त्यांनी तलावाच्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेत शोध घेतला. त्यावेळी तलावातून बाहेर पाणी सोडण्याच्या ठिकाणी खोल पाण्यात त्याचा मृतदेह सापडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com