गुजरात पात्र्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरात पात्र्र
गुजरात पात्र्र

गुजरात पात्र्र

sakal_logo
By

गुजरात प्लेऑफसाठी पात्र
लखनौ सुपर जायटंसवर दणदणीत विजय
सुनंदन लेले- सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १० ः अखेर यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफ गाठणारा पहिला संघ निश्चित झाला. हार्दिक पंड्याच्या गुजरातने लखनौचा ६२ धावांनी पराभव करून आपले स्थान निश्चित केले. गुजरात एवढाच तुल्यबळ असलेल्या लखनौचा ८२ धावांत खुर्दा उडाला.
काहीसा कमी धावसंख्येचा सामना मंगळवारी पुण्याच्या गहुंजे मैदानावर बघायला मिळाला. गुजरात संघाने अडखळत फलंदाजी करून ४ बाद १४४ धावांचा पल्ला गाठला. त्याचा पाठलाग करताना लखनौ संघाची फलंदाजी साफ कोलमडली. राशिद खानने ४ फलंदाजांना बाद करताना एक अफलातून झेल पकडून गुजरात संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.
नाणेफेक जिंकून हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. गुजरात संघाला बाद फेरीत खेळताना प्रथम फलंदाजी करायचे आव्हान आले तर काय करायला पाहिजे याचा अंदाज हार्दिकला घ्यायचा होता. विचार चांगला होता दुर्दैवाने त्याला कृतीची जोड लाभली नाही.
मोहसीन खानने वृद्धिमन साहाला लवकर बाद करून फलंदाजांवरचे दडपण वाढवले. मॅथ्यू वेड आणि कप्तान हार्दिक पंड्याला सुद्धा मोठा ठसा उमटवता आला नाही. शुबमन गिलने समंजस फलंदाजी केली ज्याला थोडी साथ डेव्हीड मिलरची मिळाली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली पण त्यात आक्रमक फटक्यांची जोड नव्हती. टोलेबाजी करता प्रसिद्ध असलेल्या गिलने २० षटके खेळपट्टीवर तग धरूनही त्याला जेमतेम ६३ धावा करता आल्या.
कमी धावांचा पाठलाग करायच्या जिद्दीने मैदानात उतरलेल्या लखनौ संघालाही पहिल्यापासून धक्के बसले. अनुभवी सलामीची जोडी क्वींटन डिकॉक- के एल राहुल तंबूत परतले. महंमद शमीच्या वेगवान चेंडूवर मारताना के एल राहुल बाद झाला आणि डिकॉक यश दयालला झेलबाद झाला. लखनऊ संघाकडून खेळायची पहिली संधी लाभलेल्या करण शर्माला जेमतेम ४ धावाच करता आल्या. ३ बाद ३३ धावसंख्येवर लखनऊचा संघ गटांगळ्या खायला लागला. जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉयनीस सारख्या अनुभवी फलंदाजांना मागे ठेवून क्रुणाल पंड्या आणि आयुष बदोनीला फलंदाजीला पाठवायचा निर्णय अगम्य होता.
संक्षिप्त धावफलक
गुजरात ः २० षटकांत ४ बाद १४४ (शुभमन गिल ६३ -४९ चेंडू, ७ चौकार, हार्दिक पंड्या ११, डेव्हिड मिलर २६, राहुल तेवतिया नाबाद २२ -१६ चेंडू, ४ चौकार, मोहसिन खान ४-०-१८-१, आवेश कान ४-०-२६-२) वि. वि. लखनौ १३.५ षटकांत सर्वबाद ८९ (केएल राहुल ८, दीपक हुडा २७, महम्मद शमी ३-०-५-१, यश दयाल २-०-२४-२, रशीद खान ३.५-०-२४-४, साई किशोर २-०-७-२)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81876 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top