दिल्ली विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्ली विजय
दिल्ली विजय

दिल्ली विजय

sakal_logo
By

दिल्लीचे आव्हान कायम
मार्शची अष्टपैलू कामगिरी, राजस्थानवर विजय
नवी मुंबई, ता. ११ ः अष्टपैलू कामगिरी करणारा; परंतु तेवढीच नशिबाचाही साथ लाभलेल्या मिशेल मार्शची ८९ धावांची खेळी आणि त्याने डेव्हिड वॉर्नसह केलेल्या १४४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने राजस्थानचा आठ विकेटने पराभव केला आणि आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले.
प्लेऑफसाठी आता उर्वरित प्रत्येक सामन्यात विजय आवश्यक असलेल्या दिल्लीने आज पहिला अडथळा पार केला. राजस्थानला १६० धावांत रोखताना मिशेल मार्शने दोन बळी घेतले. त्यानंतर ६२ चेंडूत ८९ धावा फटकावल्या व वॉर्नरसह विजय सोपा केला. पहिल्याच षटकांत बोल्टच्या चेंडूवर मार्श पायचीत होता; पण पंचांनी नाबाद ठरवले होते. राजस्थानने डीआरएस घेतला नाही. अशा प्रकारे जीवदान मिळालेल्या मार्शचा एक सोपा झेलही सोडण्यात आला. या विजयामुळे दिल्लीचे १२ गुण झाले असले तरी ते पाचव्या स्थान आहेत तर राजस्थान १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहेत.
राजस्थानची खराब सुरवात
भरवशाचा जोस बटलर पुन्हा अपयशी ठरला. गत सामन्यात तडाखेबंद खेळी करणारा यशस्वी जैसवाल १९ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेल्या अश्विनने आज कसलेल्या फलंदाजाप्रमाणे खेळी केली. आयपीएलमधील पहिले अर्धशतक केले. देवदत्त पदिक्कलनेही ४८ धावा फटकावल्या; मात्र राजस्थानच्या पुढच्या फलंदाजांना योगदान देता आले नाही. हेटयायरची उणिव त्यांना जाणवली.
संक्षिप्त धावफलक ः राजस्थान ः २० षटकांत ६ बाद १६० (आर. अश्विन ५० - ३८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, देवदत्त पदिक्कल ४८ -३० चेंडू, ६ चौकार, २ षटकार, चेतन सकारिया ४-०-२३-२, नॉर्किया ४-०-३९-२, मिशेल मार्श ३-०-२५२) पराभूत वि. दिल्ली ः १८.१ षटकांत २ बाद १६१ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ५२ - ४१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, मिशेल मार्श ८९ -६२ चेंडू, ५ चौकार, ७ षटकार, ट्रेंट बोल्ड ४-०-३२-१)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81994 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top