
वॉर्सा - मुंबई विमानसेवा ३१ मेपासून सुरू
मुंबईतून पोलंडसाठी
थेट विमानसेवा सुरू
मुंबई, ता. १ ः पोलंडची राजधानी वॉर्सा येथून मुंबईपर्यंत थेट विमान सेवा ३१ मेपासून सुरू झाली आहे. या विमान सेवेमुळे दोन देशांमधील पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पोलिश एअरलाईन्सची ही विमान सेवा आठवड्यातून तीनदा उड्डाण करेल. पोलंड गणराज्याचे भारतातील राजदूत प्रो. ॲडम बुराकोवस्की यांनी बुधवारी ही माहिती दिली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोलंड-भारत यांच्यात १९५४ पासून राजनैतिक संबंध असले तरी मुंबई येथील दूतावास १९३३ पासून सुरू असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. शिक्षण क्षेत्रातदेखील पोलंड भारताशी सहकार्य करण्यास इच्छुक असून यासंदर्भात आजच मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड येथून काही निर्वासित कोल्हापूर येथे आले होते. त्यामुळे पोलंडचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंड सरकारच्या वतीने कोल्हापूर येथे एक स्मारक होणार असून यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84389 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..