सहा व्हिडीओंवर शिक्कामोर्तब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा व्हिडीओंवर शिक्कामोर्तब
सहा व्हिडीओंवर शिक्कामोर्तब

सहा व्हिडीओंवर शिक्कामोर्तब

sakal_logo
By

अश्विनी बिर्दे खून खटला

कुरुंदकरने मारहाण केल्याप्रकरणी
सहा व्हिडिओ न्यायालयात सादर
१८ व्हिडिओ, ८४ फोटो, १०० ऑडिओ क्लिप रिकव्हर
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ८ : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांना मुख्य संशयित अभय कुरुंदकर याने मारहाण केल्याचे सहा व्हिडिओ शुक्रवारी (ता. ८) पनवेल सत्र न्यायालयात इनकॅमेरा दाखवण्यात आले. अश्विनी आणि कुरुंदकरच्या मोबाईलमधून सायबर संगणकतज्ज्ञ रोशन बंगेरा यांनी १८ व्हिडिओ, ८४ फोटो आणि १०० ऑडिओ क्लिपचा डेटा रिकव्हर केला आहे. बंगेरा यांची सरकारी पक्षाकडून तपासणी सुरू असताना न्यायालयात दाखवलेल्या सहा व्हिडिओंवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही सुनावणी इनकॅमेरा घेण्यात आल्याने या वेळी फक्त आरोपी व आरोपीचे वकील तसेच सरकारी वकील उपस्थित होते.
अश्विनी बिद्रे खूनप्रकरणाची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पढेलवार यांच्या समोर सुरू आहे. आज सुनावणीदरम्यान सायबर संगणकतज्ज्ञ रोशन बंगेरा साक्ष देण्यासाठी उपस्थित होते. बंगेरा, या हत्याकांडातील ४२ वे साक्षीदार असून त्यांनी सीबीआय तपास करीत असलेल्या काही महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी सायबर संगणकतज्ज्ञ म्हणून काम केले आहे.
सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले, की अश्विनी यांचा खून झाल्यानंतर सर्व पुरावे मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांनी नष्ट केले होते. मात्र बंगेरा यांनी अश्विनी यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि घरातील कॅमेऱ्यामधून १८ व्हिडिओ आणि १०० ऑडिओंचा डेटा रिकव्हर केला आहे. अश्विनी आणि कुरुंदकर यांनी एकमेकांना पाठविलेले फोटो बंगेरा यांनी गुगल ड्राईव्ह आणि व्हॉट्सॲपवरून पुन्हा मिळावले आहेत. बंगेरा यांनी रिकव्हर केलेल्या डेटामध्ये काही व्हिडिओ हे अश्विनी यांना मारहाण केल्याचे आहेत. यातीलच सहा व्हिडिओ शुक्रवारी न्यायालयात दाखवून त्यांची खातरजमा करण्यात आली. याप्रसंगी न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो आदी उपस्थित होते. खटल्याची पुढील सुनावणी येत्या १५ जुलै रोजी होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88311 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top