आमदार लाड यांच्या घराबाहेर सोन्या-चांदीने भरलेली बॅग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार लाड यांच्या घराबाहेर सोन्या-चांदीने भरलेली बॅग
आमदार लाड यांच्या घराबाहेर सोन्या-चांदीने भरलेली बॅग

आमदार लाड यांच्या घराबाहेर सोन्या-चांदीने भरलेली बॅग

sakal_logo
By

आमदार लाड यांच्या घराबाहेर पैसे,
दागिण्यांनी भरलेली बॅग सापडली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर पैसे, सोने-चांदी, मौल्यवान धातूंच्या मूर्ती यांनी भरलेली बॅग सापडल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेनंतर माटुंगा पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. अज्ञातांनी ही बॅग लाड यांच्या घराबाहेर ठेवल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी लाड यांना दिली. त्यानंतर लाड यांनी स्वतः मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून याबाबत कळवले.
माटुंगा परिसरात आमदार प्रसाद लाड यांचे निवासस्थान आहे. ही बॅग घराबाहेर आढळल्याने सुरुवातीला भीतीचे वातावरण होते. परंतु पोलिस तपासात या बॅगेत पैसे, सोने चांदी व मूर्ती आढळून आपल्याचे स्पष्ट झाले. आमदारांच्या घराला सुरक्षा असताना अशा प्रकारे बॅग सापडल्याने या प्रकाराकडे संशयाने पाहिले जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. प्रसाद लाड यांच्या देवघरातील साहित्य चोरण्यात आल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे यापूर्वीच गुन्हा दाखल करून तपासाला सुरू करण्यात आला होता. प्रसाद लाड यांच्या सुरक्षेला धोका म्हणून लाड यांनी मुंबई पोलिसांना परिसरातील गस्त वाढवावी अशी विनंती केलेली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
पहाटे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर पैशाने भरलेली बॅग सापडताच त्यांनी याप्रकरणाची संपूर्ण माहिती तत्काळ पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. आता याप्रकरणी तपास सुरू आहे. प्रसाद लाड यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88530 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top