श्रीलंकेचा थराराक विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीलंकेचा थराराक विजय
श्रीलंकेचा थराराक विजय

श्रीलंकेचा थराराक विजय

sakal_logo
By

आशिया करंडक ः बांगलादेशचे आव्हान संपुष्टात
श्रीलंकेचा थराराक विजय
सुनंदन लेले सकाळ वृत्तसेवा
दुबई, ता. १ ः अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात `यजमान` श्रीलंकेने बांगलादेशचा दोन विकेटने पराभव करून आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. या पराभवामुळे बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले. विजयासाठी १८४ धावांच्या आव्हानसमोर चढ उतार झालेल्या श्रीलंकेने अखेरचे चार चेंडू असताना विजय मिळवला. निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याचा फटका बांगलादेशला बसला.
स्पर्धेतील अस्तित्व टिकवून ठेवायच्या इराद्याने मैदानात श्रीलंकन फलंदाज उतरले. सलामीवीर कुशल मेंडिसने बांगलादेशी गोलंदाजांना समर्थपणे तोंड देत फटके मारले. त्याला म्हणावी तशी साथ समोरून मिळाली नाही. मेहदी हसन मीराजच्या गोलंदाजीवर कुशल मेंडिस बाद झाला पण तो नो होता. त्याच जीवदानाचा फायदा मेंडिसने घेतला. १० षटकात ४ बाद ८० धावसंख्या श्रीलंकेने उभारून प्रयत्न कायम ठेवले होते. एव्हाना धावगती १० धावांची सरासरी पार करून गेली होती.
३२ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या कुशल मेंडिसकडे सगळ्यांचे लक्ष होते. तीन बळी घेणाऱ्या इबादत हुसेनच्या तिसऱ्या षटकात श्रीलंकन फलंदाजांनी २२ धावा काढल्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या. शेवटच्या ५ षटकात धमाल झाली. बांगलादेशी गोलंदाजांनी कमी वेगाच्या आखूड टप्प्याचा मारा करून मेंडिस - हसारंगाला बाद करून श्रीलंकेला अडचणीत आणले. शनाका ४५ धावांवर झेलबाद झाल्यावर श्रीलंकन आव्हानाला लागलेला धक्का पचवून तळातील फलंदाजांनी कमाल केली. शेवटच्या षटकात गरजेच्या ८ धाव काढून सामना जिंकून श्रीलंकन संघाने पुढील फेरीत पाऊल ठेवले
तत्पूर्वी, भरवशाचा फलंदाज मुशफिकूर लवकर तंबूत परतल्यावर धावांचा साथ वाढवायला कर्णधार शकिब कामाला लागला. श्रीलंकन वेगवान गोलंदाजांच्या वेगाचा फायदा घेत शकिबने युक्तीचे फटके मारले. पाचव्या विकेटसाठी अनुभवी मेहमदुल्लाने अफीफ सोबत महत्वाची अर्धशतकी भागीदारी रचली. छोट्या चणीच्या अफीफ ताकदीने फटके मारताना दिसला. अफिफाने केलेल्या ३९ धावांमुळे बांगलादेशी धावफलकाला आकार आला. मोसादेकने तळात तस्कीन सोबत शेवटच्या काही चेंडूत मोलाच्या धावा जोडल्या. बांगलादेशने २० षटकात ७ बाद १८३ चा टप्पा गाठून चांगले आव्हान श्रीलंकन फलंदाजांसमोर उभे केले.

श्रीलंका ः १९.२ षटकांत ८ बाद १८४ (कुशल मेंडिस ६० -३७ चेंडू, दाकुन शनाका ४५ -३३ चेंडू, अशिता फर्नांडो नाबाद १०, तस्किन अहमद ४-०-२४-२, इदाबोत हुसैन ४-०-५१-३)
बांगलादेश ः

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95363 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..