आता चेंडूला लाळ लावता येणार नाही (आयसीसीकडून नवे नियम जाहीर) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता चेंडूला लाळ लावता येणार नाही (आयसीसीकडून नवे नियम जाहीर)
आता चेंडूला लाळ लावता येणार नाही (आयसीसीकडून नवे नियम जाहीर)

आता चेंडूला लाळ लावता येणार नाही (आयसीसीकडून नवे नियम जाहीर)

sakal_logo
By

चेंडूला लाळ लावणे
आता कायमचे बंद!
आयसीसीकडून नव्या नियमांचा एकपासून अवलंब
दुबई, ता. २० ः आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीकडून एक ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणाऱ्या नव्या नियमांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. नव्या बदलानुसार आता खेळाडूंना चेंडूला लाळ लावता येणार नाही. कोरोना या संसर्गजन्य आजारापासून अंमलात आणलेला हा नियम आता कायमस्वरूपी करण्यात आला आहे.
आयसीसीच्या क्रिकेट समितीकडून नव्या बदलांची शिफारस करण्यात आली होती. भारताचे सौरव गांगुली या समितीचे प्रमुख होते. मेरीलीबोन क्रिकेट क्लब या क्रिकेटच्या नियमात नव्या बदलांचे अपडेट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येणारा टी-२० विश्‍वकरंडक नव्या नियमांसह खेळवण्यात येणार आहे.

नियमातील बदल
- जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद होतो, तेव्हा नॉन स्ट्रायकरवर असलेल्या फलंदाजाने झेल घेण्याआधी बाद होणाऱ्या फलंदाजाला क्रॉस केले असल्यास पुढच्या चेंडूवर तोच फलंदाजीला येत असे. अशा वेळी नवीन येणारा फलंदाज नॉन स्ट्रायकरवर जातो; पण आता नव्या बदलानुसार कोणत्याही परिस्थितीत नवीन येणारा फलंदाज स्ट्रायकर असणार आहे.
- कोरोना संसर्गजन्य. त्याचे पडसाद क्रिकेटवरही उमटले. चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली. दोन वर्षे झाली तरी ही बंदी कायम होती. आता खेळाडूंना चेंडूला कायमसाठी लाळ लावता येणार नाही. नव्या बदलानुसार चेंडूला लकाकी आणण्यासाठी खेळाडूंना घामाचा वापर करावा लागणार आहे.
- पूर्वी कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये नव्या फलंदाजाला स्ट्राईकवर येण्यासाठी तीन मिनिटांचा अवधी असायचा; पण आता कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडे फक्त दोन मिनिटांचाच अवधी असणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ९० सेकंदांपर्यंत त्याला फलंदाजीला मैदानात यावे लागणार आहे. असे न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार याविरोधात अपील करू शकतो.
- फलंदाजी करताना फलंदाजाच्या शरीराचा भाग किंवा बॅट ही खेळपट्टीच्या आतमध्ये असायला हवी. असे नसल्यास पंचांकडून त्या चेंडूला डेड बॉल म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच फलंदाजाने खेळपट्टीच्या बाहेर जाऊन चेंडू मारल्यास पंचांकडून तो चेंडू नो बॉल देण्यात येणार आहे.
- गोलंदाजी करताना गोलंदाजाकडून किंवा त्यांच्या संघातील इतरांकडून अयोग्य किंवा जाणूनबुजून केलेल्या हालचाली दिसल्यास पंचांकडून तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावाही पेनल्टीच्या रूपात देण्यात येतील.
- खेळाच्या दरम्यान नॉन स्ट्रायकरला धावचित बाद करणे अयोग्य मानले जात असे. आता गोलंदाजाने नॉन स्ट्रायकर चेंडू टाकण्याआधी बाद केल्यास त्याला धावचित बाद दिले जाणार आहे.
- फलंदाज चेंडू टाकण्याआधी क्रीझमध्ये मागे-पुढे करीत असल्यास गोलंदाज त्याला धावचित करण्याचा प्रयत्न करीत असे, पण आता गोलंदाजाने असे केल्यास हा चेंडू डेड बॉल दिला जाणार आहे.
- निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत, तर टी-२० क्रिकेटमध्ये ३० यार्डमध्ये एक क्षेत्ररक्षक वाढवावा लागतो. आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही या नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97755 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..