गुजरातचा विजय

गुजरातचा विजय

MUM23E16306-1
मोहाली ः आयपीएलमध्ये गुरुवारी पंजाबविरुद्ध तडाखेबाज फलंदाजी करणारा गुजरात टायटन्सचा शुभम गिल.

गुजरात टायटन्सची गाडी रुळावर
अखेच्या षटकात विजय, शुभमन गिलचे अर्धशतक

मोहाली, ता. १३ ः हातातोंडाशी आलेला घास रिंकून सिंगच्या धडाकेमुळे गमावलेल्या गुजरात संघाने आयपीएलमधील आपली गाडी रुळावर आणली. आजच्या सामन्यात पंजाबचा एक चेंडू आणि सहा विकेटने पराभव केला; मात्र १५४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी अखेरच्या षटकापर्यंत लढावे लागले.
यश दयालच्या `त्या` षटकात रिंकू सिंगने अखेरच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारले. त्यामुळे गुजरातला तो सामना गमवावा लागला होता. आजच्या सामन्यात यशला वगळून हार्दिक पंड्या मैदानात उतरला होता. एकीकडे गुजरातचा संघ सावरत असताना पंजाब मेल मात्र फलंदाजीत घसरला. त्यांना २० षटकांत ८ बाद १५३ धावाच करता आल्या. गुजरातने आव्हान १९.५ षटकांत पार केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबचे सलामीवीर प्रभसिमरन आणि शिखर धवन पहिल्या चार षटकांत बाद झाल्यावर मॅथ्यू शॉर्टने २४ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. त्यानंतर भानुका राजपक्षा, जितेश शर्मा आणि सॅम करन यांनी बऱ्यापैकी धावा केल्या; परंतु धावांचा वेग त्यांना वाढवता आला नाही. शाहरुख खानने ९ चेंडूत २२ धावा केल्यामुळे पंजाबला कसेबसे दीडशतक करता आले.
फॉर्मात असलेल्या वृद्धिमन साहा आणि शुभमन गिल यांनी दहा धावांच्या सरासरीने ४८ धावांची सलामी देऊन भक्कम पायाभरणी केली. मात्र साहानंतर साईसुदर्शन आणि कर्णधार हार्दिक पंड्या बाद झाले. शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरला. अखेरच्या षटकांत गिल बाद झाल्यावर गुजरातवर दडपण आले होते, मात्र दोन चेंडूत चार धावांची गरज असताना राहुल तेवाटियाने चौकार मारून विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक ः पंजाब ः २० षटकांत ८ बाद १५३ (मॅथ्यू शॉर्ट ३६ -२४ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, भानुका राजपक्षा २०, जितेश शर्मा २५, सॅम करन २२, एम. शाहरुख खान २२ -९ चेंडू, १ चौकार, २ षटकार, मोहम्मद शमी ४-०-४४-१, अल्झारी जोसेफ ४-०-३२-१, रशिद खान ४-०-२६-१, मोहित शर्मा ४-०-१८-२)
गुजरात १९.५ षटकांत ४ बाद १५४ (वृद्धिमन साहा ३० -१९ चेंडू, ५ चौकार, शुभमन गिल ६७ -४९ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, डेव्हिड मिलर नाबाद १७, अर्शदीप सिंग ४-०-३३-१, रबाडा ४-०-३६-१, सॅम करन ३.५-०-२५-१)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com