प्रज्ञाशोध परीक्षेत ''कागल ''चा झेंडा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रज्ञाशोध परीक्षेत ''कागल ''चा झेंडा.
प्रज्ञाशोध परीक्षेत ''कागल ''चा झेंडा.

प्रज्ञाशोध परीक्षेत ''कागल ''चा झेंडा.

sakal_logo
By

प्रज्ञाशोध परीक्षेत ‘कागल’चा झेंडा
मुरगूड, ता. २९ : जिल्हा परिषदेतर्फे एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या चौथी आणि सातवीच्या अंतिम प्रज्ञाशोध निवड परीक्षेत जिल्ह्यात कागल तालुका पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. सलग चार वर्षे कागल तालुक्याने प्रथम स्थान टिकवून ठेवल्याची माहिती कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी प्रसिद्घीस दिली आहे.
इयत्ता चौथीच्या अंतिम परीक्षेत तालुक्यातून २४४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील २३८ विद्यार्थी पात्र ठरले असून, पात्रतेची टक्केवारी ९७.५४% इतकी आहे. यामधील एका विद्यार्थ्याने पहिल्या १० मध्ये स्थान पटकावले असून, जिल्ह्यातील सर्वसाधारण १०० विद्यार्थ्याच्या यादीत कागलचे तब्बल २६ विद्यार्थी समाविष्ट आहेत. इयत्ता सातवीचे ११८ विद्यार्थी अंतिम परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यातील ११४ विद्यार्थी पात्र ठरले असून, ९६.६१% इतकी टक्केवारी आहे. जिल्ह्यातील सर्वसाधारण १०० च्या यादीत १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चौथी, सातवी एकत्रित निकालामध्ये यावर्षीही कागल तालुका प्रथम स्थानावर असून, ४६ विद्यार्थी चमकले आहेत. प्रशासनाच्या वतीने देणगीदारांमार्फत तालुका स्तरावर चार सराव चाचण्यांचे नियोजन केले होते. या परीक्षेस जिल्ह्यातील चौथी आणि सातवीच्या वर्गात शिकणारे जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी प्रविष्ठ होतात. या यशात या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्यांनी समयदान उपक्रमातर्गंत जादा वेळ देऊन मार्गदर्शन केले होते. तसेच केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पालक, विस्तार अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभल्याचे डॉ. कमळकर यांनी सांगितले आहे.
.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02779 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top