
टुडे २
02894
मुरगूड : शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी शिवपुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून केलेली पुष्पवृष्टी.
मुरगूडला हेलिकॉप्टरमधून
शिवपुतळ्यावर पुष्पवृष्टी
मुरगूड, ता. ६ : शिवपुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून केलेली पुष्पवृष्टी, शिवकालीन युद्धकला, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, छत्रपती संभाजीराजे, मावळे, घोडेस्वार यांचे सजीव देखावे, पारंपरिक वाद्ये, शिवरायांचा जयघोष आणि मंगलमय वातावरणात मुरगूडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. सर्वपक्षीय संयुक्त गावभाग शिवप्रेमींतर्फे आयोजन केले होते.
रविवारी रात्री जय भवानी गोंधळ ग्रुप कोल्हापूर व समस्त गोंधळी समाजातर्फे भवानी गोंधळ कार्यक्रम झाला. सकाळी वैभव जंगम आणि सहकाऱ्यांनी केलेल्या मंत्रोच्चारात शिवमूर्तीस अभिषेक केला. महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. अश्वारूढ पुतळ्यावर दुपारी सव्वातीन वाजता माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, ॲड. सुधीर सावर्डेकर, रणजित सूर्यवंशी यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी डॉ. श्रीकृष्ण देशमुख, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, भाजप जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह पाटील आदींनी दर्शन घेतले. मर्दानी खेळ, भवानी मातेचा गोंधळ, लेझर शोच्या झगमगाटात चार वाजता अंबाबाई मंदिरपासून शोभायात्रा निघाली. शोभायात्रेत दहा घोड्यांचा व मावळ्यांचा समावेश होता. महिलांचे लेझीम पथक, धनगरी ढोल व पारंपरिक ढोल पथक पुणे यांच्यासह मुरगूड व परिसरातील युवकांच्या सजीव देखाव्याचा सहभाग होता. मुरगूड विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सजीव देखावा सादर केला. शिवपुतळ्यासमोर रात्री आतषबाजी करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02789 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..