तिघांवर गुन्हा दाखल. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिघांवर गुन्हा दाखल.
तिघांवर गुन्हा दाखल.

तिघांवर गुन्हा दाखल.

sakal_logo
By

आठ लाखांच्या फसवणुकीबद्दल
महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
पंधरा दिवसांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष

मुरगूड, ता.१ : पंधरा दिवसांत पैसे दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून आठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका फायनान्स कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर रेश्मा नदाफ (रा. इचलकंरजी), विजय येटाळे (सरवडे, ता. राधानगरी) यांच्यावर तसेच धमकी दिल्याप्रकरणी योगेश बाळासो राणे याच्यावर मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जॉन्सन जेरोन फर्नांडिस (मुरगूड, ता. कागल) यांचा फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मुरगूडमधील सचिन माळी या मित्राचे सरवडे (ता. राधानगरी) येथे औषध दुकान आहे. त्याने सरवडेतील त्याचे मित्र येटाळे यांची जॉन्सनबरोबर ओळख करून दिली व तो १५ दिवसांत पैसे दुप्पट करुन देत असल्याचे सांगितले. आपण दोन लाख रुपये येटाळेकडे गुंतवल्याचे सांगितले. येटाळेने दिल्ली येथील फायनान्स कंपनी असून, त्या कंपनीतर्फे १५ दिवसांत पैसे दुप्पट केले जातात, असे सांगितले. नदाफ कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. कित्येकांचे पैसे त्यांनी डब्बल करून दिलेत. यावर विश्वास ठेवून १० फेब्रुवारी २०२२ रोजी येटाळे यांना मुरगूडला बोलवून शाळेच्या मैदानावर माळी याच्या समक्ष १५ लाख रुपये रोख दिले. यावेळी येटाळे याने पंधरा दिवसांत ३० लाख रुपये देण्याची हमी दिली. त्यानंतर २५ दिवसांनी पैशाबाबत येटाळे याच्याकडे विचारणा केली असता अजून कंपनीने पैसे दिले नाहीत, असे सांगितले.
संशयित नदाफ यांनीही पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर येटाळे याच्याकडे वारंवार तगादा लावल्याने त्याने पंधरा लाखांपैकी सात लाख रुपये परत केले, तर उर्वरित आठ लाख रुपये दिले नाहीत. दरम्यान, कोल्हापुरातील संशयित राणे याने फोन करून नदाफ हिच्याकडे पैसे मागायचे नाहीत. नाही तर तुला सोडणार नाही, धमकी दिली आहे. याची फिर्याद गुंतवणूकदार जॉन्सन जेरोन फर्नांडिस यांनी पोलिसांत दिली आहे. अधिक तपास मुरगूड पोलिस करत आहेत.
.......

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02818 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top