एसटी रोको आंदोलन स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी रोको आंदोलन स्थगित
एसटी रोको आंदोलन स्थगित

एसटी रोको आंदोलन स्थगित

sakal_logo
By

२५ जुलैचे एसटी रोको आंदोलन स्थगित
-
गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्याचे आश्वासन

मुरगूड, ता. २१ : ग्रामीण भागातून मुरगूडला शाळा, महाविद्यालयांना येणाऱ्या विद्यार्थ्यांना
वेळेत एसटी बसेस नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे २५ जुलैला मुरगूड येथे केले जाणारे एसटी रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत मुरगूड बसस्थानकात व गारगोटी आगाराचे आगार व्यवस्थापक दि. वा. ठोंबरे, कागल आगाराचे आगार व्यवस्थापक, शिवराज विद्यालयाचे उपप्राचार्य रवींद्र शिंदे, प्रा. सुनील डेळेकर, मुरगूड विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. यामध्ये
गारगोटी-मुरगूड (वाघापूर मार्गे) ही बस सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गारगोटी आगाराच्या २०१९ मध्ये ७८ गाड्या धावत होत्या. त्यांतील कोरोना काळात तब्बल २२ गाड्या भंगारात गेल्या आहेत. त्यामुळे सध्या केवळ ५६ गाड्याच धावत आहेत. यामध्ये भुदरगड तालुक्यातील व अन्य ठिकाणच्या बस फेऱ्या सुरू आहेत. त्यातून विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या बहुतांशी फेऱ्या सुरू केल्या आहेत. आगारात नवीन बसेस दाखल होताच पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू ठेवण्यात येईल, असे आश्वासन ठोंबरे यांनी दिले. यावेळी त्यांनी सोमवारी (ता. २५) मुरगूड येथे होणारे एसटी रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंतीही केली. त्यानुसार हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02840 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top