कागल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल
कागल

कागल

sakal_logo
By

03012
विकासराव पाटील


विकासराव पाटील ः सर्वसमावेशक नेतृत्व

लीड
समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड सुरू असते. त्यातूनच विकास साधला जातो. कागल तालुक्याला असेच युवा नेतृत्व लाभले आहे, ते म्हणजे युवकांच्या कुशल संघटनेतून उदयाला आलेले युवा नेते विकासराव पाटील-कुरुकलीकर. त्यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने....
- विनायक पाटील, कुरुकली.

माजी ग्रामविकासमंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कागल तालुक्याच्या राष्ट्रवादी पक्षाची धुरा ते खांद्यावर घेऊन वाटचाल करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ. अर्चना बिद्री साखर कारखान्यात संचालिका म्हणून काम पाहतात. राजकीय वारसा नसणाऱ्या दिवंगत हंबीरराव पाटील (पापा) यांनी बिद्री कारखान्याचे संचालक म्हणून निवडून येऊन कुरुकलीसारख्या खेडेगावाला समाजकारणाचे केंद्र बनवले. हंबीरराव पाटील यांच्या अकाली निधनाने कागलच्या राजकारणात व समाजकारणात पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी हंबीरराव पापा यांचे लहान बंधू सयाजीराव पाटील या शांत, संयमी कार्यकर्त्याला बिद्रीचे संचालकपद देऊन कुरुकलीवर प्रेम असल्याचे सिद्ध केले. दरम्यान, वडिलांचे छत्र हरपलेल्या विकास पाटील यांना संधी देण्याचा शब्द नेत्यांनी दिला. विकास पाटील यांनी तरुण मंडळाच्या माध्यमातून युवकांची भक्कम फळी उभी केली. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत,
गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी विकास पाटील दक्ष असतात.
ग्रामदैवत घोडेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ बनवण्यात व त्यासाठी कोट्यवधींचा निधी श्री. मुश्रीफ यांच्या माध्यमातून खेचून आणून परिसराचा कायापालट करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. विधवा महिला, वयोवृद्ध यांना पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मुश्रीफ यांनी मुंबईत गोरगरिबांची वेगवेगळी आॅपरेशन मोफत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्या माध्यमातून अनेक अडल्या-नडलेल्यांची आॅपरेशन करून आणण्यासाठी विकास पाटील कार्यतत्पर राहिले आहेत. नजीकच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघात भरीव काम करण्याचा त्यांचा मनोदय आहे. आज साजऱ्या होणाऱ्या त्यांच्या वाढदिनास शुभेच्छा.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02853 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..