समरजितसिंह घाटगे कार्यक्रम.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समरजितसिंह घाटगे कार्यक्रम..
समरजितसिंह घाटगे कार्यक्रम..

समरजितसिंह घाटगे कार्यक्रम..

sakal_logo
By

३०२०
कागलची जनताच त्यांचा
करेक्ट कार्यक्रम करेल
समरजितसिंह घाटगे; मुरगूडमध्ये साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. ६ : आमदार हसन मुश्रीफ अशोभनीय वक्तव्ये करून राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श कागलची बदनामी करत आहेत. त्यांनी भान त्यांनी ठेवले पाहिजे अन्यथा कागलची जनताच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला. बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. घाटगे म्हणाले, ‘‘एकीकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता तर दुसरीकडे स्वतःच अशोभनीय वक्तव्य करता, तुमच्या सांगण्यावरून तुमचे बगलबच्चे एकेरी वक्तव्ये करतात. मुश्रीफसाहेब जे सांगतात तेच प्रकाश गाडेकर व त्यांचे बगलबच्चे बोलतात. आम्हालाही त्याच भाषेत उत्तर देण्याबाबत कार्यकर्ते आग्रह करीत आहे. ते आमचे संस्कार नाहीत.’’
रणजितसिंह पाटील म्हणाले, ‘‘बदलत्या राजकारणात खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील व कागल तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.’’
प्रताप पाटील, संतोष गायकवाड यांचीही भाषणे झाली.
अनंत फर्नांडीस, दत्तामामा खराडे, विलास गुरव, विजय राजीगरे, सदाशिव गोधडे, अनिल अर्जुने, बजरंग सोनुले, युवराज कांबळे, राहुल खराडे, सुरेश गोधडे आदी उपस्थित होते. संग्राम साळोखे यांनी स्वागत केले. अमर चौगुले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02857 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..