सोमवारी एसटी रोको.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमवारी एसटी रोको..
सोमवारी एसटी रोको..

सोमवारी एसटी रोको..

sakal_logo
By

उखळूतील ग्रामसभेत वादळी चर्चा
तुरुकवाडी : उखळू (ता. शाहूवाडी) येथील विशेष सभेची नोटीस देऊनही गैरहजर राहिलेल्या वन्यजीवचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांचा निषेध करून तहकूब केलेली ग्रामसभा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत वादळी चर्चेत झाली. चांदोली अभयारण्य क्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या उपद्रव वाढला आहे. अभयारण्यअंतर्गत समावेश असणाऱ्या गावातील जनतेला शासकीय योजनांचा लाभ दिला जात नाही. अधिकाऱ्यांच्या अरेरावीने जनता हैराण झाली आहे. त्यांच्या तक्रारींचा पाढा उखळू ग्रामस्थांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर वाचला. संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून ग्रामसभेस उपस्थित राहण्याची सूचना माजी खासदार शेट्टी यांनी केल्याने संबंधित अधिकाऱ्यांची त्रेधा उडाली. शेट्टी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेत अभयारण्य कार्यक्षेत्रातील गावांच्या प्रलंबित सुविधा देण्याबाबत पावले उचलण्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सरपंच राजाराम मुटल, मणदूरचे सरपंच वसंत पाटील, विकास बाळतूगडे, प्रल्हाद वडाम, शिवाजी वडाम, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

03665
बाबूजमाल साहेब यांचा ऊरूस
कुंभोज ः येथील श्रद्धास्थान हजरत बाबूजमालसाहेब कलंदर पहाडी शरीफ दर्ग्याचा उरूस उत्साहात झाला. बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मजले येथील बुरूज मंडळाने बुरूज खेळाचे सादरीकरण केले. कार्यक्रमांचे उद्‍घाटन विश्वस्त महंमदहानिफ मुजावर यांनी केले. दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष शौकत मुजावर अध्यक्षस्थानी होते. दर्गाह ट्रस्टतर्फे आयोजित राजू नदाफ (इचलकरंजी) यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला. निवृत्त मुख्याध्यापक हाजी यू. सी. मुजावर यांनी उद्‍घाटन केले. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चाँदसो मुजावर अध्यक्षस्थानी होते. हारुण मुजावर व सूरज तांबोळी यांनी समा-ए-महेफील कार्यक्रम सादर केला. मुबारक मुजावर यांनी फातेहा पठण केले. सिजाऊद्दीन मुजावर यांनी सलाम पठण केले. सहायक पोलिस निरीक्षक यशवंत उपराटे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी, ग्रामपंचायत सदस्य आप्पासो पाटील, रावसो पाटील, लखन भोसले, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे उपस्थित होते. युनूस मुजावर यांनी स्वागत केले. आदम मुजावर यांनी आभार मानले.

१७४९
गावोगावी घुमू लागले ढोल-ताशे
बोरपाडळे : गणेशोत्सव जवळ येऊन लागला आहे, तसा तरुणाईमधला उत्साह वाढू लागल्याचे चित्र आहे. मंडप उभारणी, साउंड सिस्टीम टेस्टिंग, विद्युत रोषणाई जोडणी, झांजपथके आणि पारंपरिक वाद्याच्या सरावात तरुणाई गर्क दिसत आहे. गावोगावी ढोल-ताशे, लेझीम आणि हलगीचा आवाज गावोगावी घुमू लागला आहे. गल्लोगल्ली मंडप उभारणी होत असून तरुणांबरोबर लहान मुलांचा समावेश दिसत आहे. बोरपाडळेसह शहापूर, काखे, मोहरे, मिठारवाडी, आंबवडे, माले आणि जाफळे परिसरात प्रशासनाच्या ध्वनी मर्यादा पाळण्याच्या आवाहनालाही तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळणार असल्याची चिन्हे आहेत.

३७७०
संजय सुतार यांना बालभारतीचे निमंत्रण
जयसिंगपूर ः राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे यांच्या वतीने एकात्मिक व द्विभाषिक इयत्ता दुसरी भाग तिसरी व चौथीच्या पाठ्यपुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी आयोजित समीक्षण सत्रासाठी २० शिक्षकांची निवड केली आहे. त्यामध्ये लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूरमधील कलाशिक्षक संजय सुतार यांना समीक्षण सत्रासाठी बालभारतीकडून निमंत्रित केले आहे.

03078
यमगेत बांधकाम कामगारांना साहित्य
मुरगूड : गोकुळ दूध संघाची चौफेर प्रगती आहे. संघामार्फत दूध उत्पादकांसाठी विविध योजना रावबल्या जात आहेत. भविष्यात गोकुळ देशातील अग्रेसर दूध संघ बनेल, असा विश्वास संचालक नाविद मुश्रीफ यांनी व्यक्त केला. यमगे (ता. कागल) येथे राष्ट्रवादी व हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे बांधकाम कामगारांना विविध साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते. जयसिंग पाटील अध्यक्षस्थानी होते. शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष विकास पाटील यांचेही भाषण झाले. माजी सरपंच शामराव पाटील, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष निलेश शिंदे, प्रकाश सावंत, संजय कोंडेकर, किरण पाटील, राजू सावंत, जे. एन. पाटील, विशाल पाटील, विजय हुल्ले, अंबाजी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते. दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02885 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..