तीन तास एसटी रोको.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन तास एसटी रोको..
तीन तास एसटी रोको..

तीन तास एसटी रोको..

sakal_logo
By

मुरगूड बसस्थानकात रास्ता रोको
अनियमित एसटी फेऱ्या; विद्यार्थ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
मुरगूड, ता. २९ : एसटी बसगाड्यांच्या गैरसोयीबाबत बसस्थानकात विद्यार्थ्यांनी एसटी रोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले. आंदोलनामुळे सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली. अखेर आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेत अधिकाऱ्यांनी एसटी बसगाड्यांच्या मागण्या मान्य केल्या. संबंधित मार्गावर आजपासूनच गाड्या सुरू करीत असून उर्वरित बस आठ दिवसांत सुरू करीत असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मुरगूडला दररोज शाळा-महाविद्यालयांना येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत एसटी नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या संदर्भात निवेदन व पत्रव्यवहार करूनसुद्धा एसटीने त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी आज याप्रश्नी एसटी रोको आंदोलन केले. सकाळी साडेसात वाजल्यापासून शिवराजच्या शेकडो विद्यार्थ्यांनी एसटी बसस्थानकाला घेराव घातला व एसटी प्रशासनाच्या गलथानपणाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून तीन तास एसटी वाहतूक ठप्प होती. आंदोलनस्थळी गारगोटी आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे, राधानगर आगार व्यवस्थापक सागर पाटील, कागल आगारच्या सौ. आर. एस. ढेरे व कोल्हापूर विभागीय अधिकारी येताच त्यांना आंदोलक विद्यार्थी-पालक व शिक्षकांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली व त्यांना चांगलेच धारेवर धरले. यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर अधिकाऱ्यांनी एसटी बसगाड्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02889 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..