कागल ४ मने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल ४ मने
कागल ४ मने

कागल ४ मने

sakal_logo
By

03107
मुरगूड : येथे मुरगूड नगरपरिषदेच्या गौरी गीत, झिम्‍मा फुगडी स्‍पर्धेतील एक क्षण.


झिम्‍मा फुगडीत नागनाथ गट प्रथम

मुरगूड नगरपरिषदेतर्फे वर्धापनदिनानिमित्त आयोजन; १० संघांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. ९ : येथील मुरगूड नगरपरिषदेच्‍या १०१ व्‍या वर्धापनदिनानिमित झालेल्या गौरी गीत, झिम्‍मा फुगडी स्‍पर्धेत कागल तालुक्यातील सोनाळीचा नागनाथ महिला गट प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. पंडेवाडीच्या धनलक्ष्‍मी महिला मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला.
नवोदिता समरजितसिंह घाटगे, मंजूषादेवी रणजितसिंह पाटील या प्रमुख पाहुण्‍या म्हणून उपस्थित होत्‍या. स्‍पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदविला. यावेळी पारंपरिक वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. स्‍पर्धेत सामाजिक, सांस्‍कृतिक व प्रबोधनात्‍मक बाबींवर सादरीकरण झाले.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा : नागनाथ महिला गट, सोनाळी (ता. कागल), धनलक्ष्‍मी महिला मंडळ, पंडेवाडी (ता. राधानगरी), हिंदुस्‍थान महिला गट, शिंदेवाडी (ता. कागल), मैत्री महिला मंडळ, मुरगूड (उत्तेजनार्थ). विजेत्‍या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्‍कम व स्‍मृतिचिन्‍ह देऊन गौरविण्यात आले.

वैयक्तिक स्‍पर्धेचा निकाल असा : उखाणा घेणे सुजाता चौगले. फुगडी - मयुरी आडव व प्रगती मेंडके. घागर घुमविणे- अर्चना देवळे. सूप नाचविणे- नकुसा बारड. मंगळागौरी मंडळ, पाळ्याचा हुडा या नवोदित संघाने प्रेक्षकांची मने जिंकली. शालेय विद्यार्थिनींनीही सहभाग नोंदवला होता.
यावेळी वसुधा कुंभार, सुप्रिया भाट, प्रतिभा सूर्यवंशी, रेखा मांगले, अनुराधा राऊत, रंजना मंडलिक, वर्षाराणी मेंडके आदी उपस्थित होत्‍या.
स्पर्धेचे परीक्षण मृन्‍मयी सातवेकर, छाया बेलेकर यांनी केले, तर संयोजन नगर अभियंता प्राजक्‍ता पिंपळे, ज्‍योती पाटील, रेश्‍मा चौगले, रेखा कांबळे, रुक्मिणी कांबळे, सुमन कांबळे, मंगल कांबळे, साधना कांबळे, संगीता म्‍हेतर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02901 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..