मंडलिक महाविद्यालयात उद्या कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडलिक महाविद्यालयात उद्या कार्यशाळा
मंडलिक महाविद्यालयात उद्या कार्यशाळा

मंडलिक महाविद्यालयात उद्या कार्यशाळा

sakal_logo
By

मंडलिक महाविद्यालयात उद्या कार्यशाळा
मुरगूड : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे अग्रणी महाविद्यालयांतर्गत गुरुवारी (ता. १०) सकाळी दहाला ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी. पी. साळुंखे यांचे ‘व्यक्तिमत्त्व ः संकल्पना व स्वरूप’, तर प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार ‘व्यक्तिमत्त्व विकासाचे पैलू’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील भूषवणार आहेत. कार्यशाळेत गारगोटी, बिद्री, भोगावती, देवचंद, कागल, राधानगरी, सरवडे, कापशी, सोळांकूर महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी होडगे यांनी केले.