निधन : राहूल सूर्यवंशी - पाटील. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन : राहूल सूर्यवंशी - पाटील.
निधन : राहूल सूर्यवंशी - पाटील.

निधन : राहूल सूर्यवंशी - पाटील.

sakal_logo
By

00188
रामचंद्र खोत यांचे निधन
नंदगाव : हणबरवाडी (ता. करवीर) येथील स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र संतराम खोत (वय 100) यांचे निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरोधात आंदोलनात ते सहभागी होते. हणबरवाडीच्या सामाजिक, आध्यात्मिक, शेतीसह विविध क्षेत्रांत त्यांचे योगदान होते. सेवाभावी आबा म्हणून त्यांचा परिचय होता. देवस्थान समितीचे ते ज्येष्ठ सल्लागार होत. मितभाषी स्वभाव, नम्रता आणि परोपकार वृत्ती त्यांनी नेहमी जोपासली. शेतकरी सहकारी संघाचे माजी संचालक अशोकराव खोत यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

65881
म्हाळू वडर
कोल्हापूर ः कसबा बावडा येथील म्हाळू ज्ञानू वडर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २) आहे.
----------------
65889
अविनाश पडवळे
कोल्हापूर ः कदमवाडीतील अविनाश बबन पडवळे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आजी, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २) आहे.
----------------
65893
प्रकाश तिवले
कोल्हापूर ः कळंबा येथील प्रकाश रामचंद्र तिवले (वय ५७) यांचे निधन झाले. ते माजी पंचायत समिती सदस्य रंगराव तिवले यांचे ते बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
-----------
65919
ललिता नाझरे
कोल्हापूर ः हरीओमनगर येथील ललिता जयराम नाझरे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

03295
राहूल सूर्यवंशी-पाटील
मुरगूड : येथील राहुल सदाशिव सूर्यवंशी-पाटील (वय ४६) यांचे निधन झाले. गारगोटी आयसीआरई कॉलेजचे ते प्राध्यापक होत. आरटीओ अधिकारी नीता शिबे - सूर्यवंशी यांचे ते पती होत. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

01796
सावित्री पाटील
हळदी : कोथळी (ता. करवीर) येथील सावित्री आकोबा पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २) आहे.

०२१५५
रामचंद्र पाटील
चंदगड : कलीवडे (ता. चंदगड) येथील रामचंद्र जोतिबा पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. उपसरपंच अशोक रामचंद्र पाटील यांचे ते वडील होत.

२८२८
यशवंत देसाई
कळे : येथील यशवंत तुकाराम देसाई (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ३) आहे. बांधकाम साहित्य विक्रेते राम देसाई यांचे ते वडील होत.

००७८६
गोविंद बाजारी
धामोड : म्हासुर्ली पैकी बाजारी धनगरवाडा (ता. राधानगरी) येथील गोविंद आकू बाजारी (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

३१५१
राजाराम जाधव
राधानगरी : पनोरी (ता. राधानगरी) येथील राजाराम वसंतराव जाधव-सरकार ( वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, भाऊ-बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २) आहे.

०१३००
केरबा ताटे
सोनाळी : हसूर दुमाला (ता. करवीर) येथील केरबा दत्तू ताटे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.