पिंपळगांव अपघात एक ठार. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळगांव अपघात एक ठार.
पिंपळगांव अपघात एक ठार.

पिंपळगांव अपघात एक ठार.

sakal_logo
By

अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळगावचा मोटारसायकलस्वार ठार, एक गंभीर


सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. ३ : कागल - निढोरी राज्यमार्गावर पिंपळगाव बुद्रूक गावच्या हद्दीत केनवडेहून पिंपळगावाकडे जात असताना मोटारसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघातात मोटारसायकलस्वार शामराव बाबू सूर्यवंशी (वय ६०, रा. पिंपळगांव बु., ता. कागल) हे ठार झाले. तर आनंदा शंकर मांगोरे (५२, रा. पिंपळगांव बु.) हे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री घडली.
घटनास्थळावरून व मुरगूड पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पिंपळगांव बु.(ता. कागल) येथील शामराव सूर्यवंशी व आनंदा मांगोरे हे दोघे कामानिमित्त केनवडे येथे मोटारसायकल (क्रमांक एम. एच. ०९ सी क्यू ८४०३) वरुन गेले होते. काम आटोपून ते पिंपळगांवकडे घरी परतत होते. पिंपळगाव फाट्यावरील मुख्य रस्त्याने न जाता ते केनवडेहून पिंपळगांवकडे जाणाऱ्या जवळच्या रस्त्याने जाण्यासाठी वळत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील शामराव सूर्यवंशी व आनंदा मांगोरे हे दोघेही रस्त्यावर जोरात आपटले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जोरदार रक्तत्राव झाला. त्यात शामराव सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात नेले. आनंदा मांगोरे हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर पिंपळगांवावर शोककळा पसरली होती. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम मुरगूड पोलिस करीत होते.
........