साहित्य संस्कृतीचे जतन काळाची गरज : डवरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य संस्कृतीचे जतन 
काळाची गरज : डवरी
साहित्य संस्कृतीचे जतन काळाची गरज : डवरी

साहित्य संस्कृतीचे जतन काळाची गरज : डवरी

sakal_logo
By

साहित्य संस्कृतीचे जतन
काळाची गरज : डवरी
मुरगूडला कविसंमेलनास रसिकांचा प्रतिसाद
मुरगूड, ता. ५ : सोशल मीडियाच्या युगात साहित्याकडील ओढा कमी होतोय. पण विचार आणि संस्कारच आपल्याला तारू शकतात. वाचन व लेखन हे आपले अंगीकृत जीवनाचे अविभाज्य भाग असल्याने साहित्य संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत साहित्यिक भैरवनाथ डवरी यांनी व्यक्त केले.
येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात आयोजित कवि संमेलनात ते बोलत होते. गजाननराव गंगापूरे अध्यक्षस्थानी होते. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, डी. डी. चौगले, एम. डी. रावण, एस. आर. बाईत, प्रदीप वर्णे, लेखक पी. आर. पाटील महादेव वाघवेकर, सिकंदर जमादार, एम. टी. सामंत आदी प्रमुख उपस्थित होते. जयवंत गोंधळी यांनी गायलेल्या भक्ती गीताने कविसंमेलनाची सुरुवात केली. कवी बाबूराव गुरव, ऊर्मिला पागम, संतराम पाटील, भरत सोनगेकर, प्रा. राणी हुजरे, धोंडिराम परीट, प्रवीण सूर्यवंशी व सिकंदर जमादार यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले. प्रा. विनय कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रा. सुनील डेळेकर यांनी प्रास्ताविक केले. विकास सावंत यांनी आभार मानले.