कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड
कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड

कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड

sakal_logo
By

03332
नेहा चौगले
03333
स्वाती शिंदे
03334
अमृता पुजारी

वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती
स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड
मुरगूड, ता. १८ : येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (मंडलिक साई आखाडा) कुस्ती संकुलाच्या तीन महिला कुस्तीगिरांची विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.
सह्याद्री कुस्ती संकुल वारजे, (पुणे) येथे महाराष्ट्राच्या कुस्ती संघाची निवड चाचणी स्पर्धा झाली. नेहा किरण चौगले - ५० किलो वजनगट - प्रथम, स्वाती संजय शिंदे - ५३ किलो वजनगट - प्रथम, अमृता शशिकांत पुजारी हिने ६५ किलो गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे, वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. खासदार संजय मंडलिक, अॅड. वीरेंद्र मंडलिक, साई राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, कार्यवाह आण्‍णासो थोरवत, डॉ. प्रशांत अथणी, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर जिल्हा तालीम संघ, राहुल शिंदे यांचे प्रोत्साहन मिळाले.
.....