निढोरीत सकाळीच झाले मतदान क्लोज ..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निढोरीत सकाळीच झाले मतदान क्लोज ..!
निढोरीत सकाळीच झाले मतदान क्लोज ..!

निढोरीत सकाळीच झाले मतदान क्लोज ..!

sakal_logo
By

निढोरीत सकाळीच झाले ‘मतदान क्लोज’

मुरगूड : निढोरी (ता. कागल) येथील प्रभाग तीनमध्ये सकाळी मतदान सुरू असताना मतपेटीत १११ मते नोंदवल्यानंतर एक तासानंतरची आकडेवारी घेण्यासाठी ‘टोटल बटन’ दाबण्याऐवजी महिला मतदान अधिकाऱ्यां‍नी ‘क्लोज बटन’ दाबल्यामुळे मतप्रक्रियाच थांबली. तब्बल ६५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर दुसरे मशिन आणून मत प्रक्रिया सुरू करण्यात आली. एकूण २११२ पैकी १९८९ म्हणजे ९४.१७ टक्के इतक्या चुरशीने मतदानाची नोंद झाली.