आमरण उपोषण...

आमरण उपोषण...

अतिक्रमणप्रश्नी मुरगूडमध्ये उपोषणाचा इशारा

मुरगूड : येथील नगरपालिकेने न्यायालयाने आदेश दिलेला असतानादेखील अतिक्रमण न हटवल्याच्या निषेधार्थ सोमवार (ता.९) पासून पालिकेच्या दारात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे माजी नगरसेवक एकनाथ बरकाळे यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, बस स्थानक ते बाजारपेठ यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर खोकीधारकांनी अतिक्रमण केले आहे. पालिका प्रशासन या खोकीधारकांना रस्त्यावरच पक्के बांधकाम करून देणार होते. अनधिकृत बांधकामामुळे व शाळा महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बांधकामास परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. ८ जून २०२१ रोजी जिल्हा न्यायालयाने ही बांधकामे अनधिकृत असून, ती पालिकेने तत्काळ काढून घ्यावीत, असे निर्देश दिले आहेत, मात्र पालिकेने त्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. न्यायालयाची स्थगिती असतानाही काहींनी पत्र्याची शेड उभारून बांधकामे केली आहेत. पालिका प्रशासनाला वेळोवेळी याबाबत कळवूनही पालिकेने आजअखेर कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे सोमवारपासून बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com