मुरगूडला कायदेविषयक मार्गदर्शन

मुरगूडला कायदेविषयक मार्गदर्शन

03394
मुरगूड : येथे न्यायमूर्ती बी. डी. गोरे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. या वेळी एस. आर. पाटील, विकास बडवे व मान्यवर उपस्थित होते.

मुरगूडला कायदेविषयक मार्गदर्शन
मुरगूड : प्रत्येकाने कायदा मानणारे नागरिक बनले पाहिजे, असे मत कागलचे दिवाणी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. डी. गोरे यांनी व्यक्त केले. कागल तालुका विधी सेवा समिती, कागल बार असोसिएशन आणि मुरगूड विद्यालय जुनिअर कॉलेज यांच्यातर्फे मुरगूड विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी न्यायमूर्ती गोरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस. एच. निर्मळे, तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे आदी प्रमुख उपस्थित होते. ॲड. एस. बी. गुरव, ॲड. शितोळे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील मळवी यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक एस. आर. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ए. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य एस. पी. पाटील यांनी आभार मानले. राहुल देसाई, कविता नाईक, ॲड. जीवन शिंदे, ॲड. सुधीर सावर्डेकर, ॲड. गणपती चौगुले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com