
मुरगूडला मंगळवारी रोजगार भरती मेळावा (सुधारीत)
मुरगूडला आज रोजगार भरती मेळावा
मुरगूड ः कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुरगूड (ता. कागल) यांच्यातर्फे अॅप्रेंटिस व रोजगार भरती मेळाव्याचे मंगळवारी (ता. २८) सकाळी ९ सायंकाळी ५ पर्यंत आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली. यावेळी विविध आस्थापनांशी सामंजस्य करार स्वाक्षरी होणार आहे. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणेचे वाय. पी. पारगांवकर, जीआयटीआय अधिकारी, वाय. बी. पाटील, आयएमसी चेअरमन संग्रामसिंह पाटील उपस्थित राहतील. नवी दिल्ली अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचा दर्जा वाढ करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होईल. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत खासगी आस्थापनातील ३०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती मेळावा होणार असून आयटीआय उत्तीर्ण व प्रवेशित नोकरीस इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घेता येणार आहे.