मुरगूडला लाखांची बक्षिसे असणारी बैलगाडी शर्यत.

मुरगूडला लाखांची बक्षिसे असणारी बैलगाडी शर्यत.

मुरगूडला उद्या भव्य बैलगाडी शर्यती
मुरगूड, ता. ३ : मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस गौरव समिती व राणा प्रताप क्रीडा मंडळातर्फे रविवारी (ता. ५) सायंकाळी ४ वाजता तीन लाखांची बक्षिसे असणाऱ्या दुबैलगाडी (विनाकाठी व विनामोटारसायकल) शर्यतींचे आयोजन केले आहे, अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
जनरल बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी १ लाख २५ हजार २२८ रु. बक्षीस आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रमे ७५ हजार २२८ रुपये व ५१ हजार २२८ रुपये बक्षीस आहे. ‘ब’ गटातील बैलगाडी शर्यतीसाठी पहिल्या तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे २५ हजार २२८, १५ हजार २२८ व रुपये १० हजार २२८ अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकमधून बैलगाड्या सहभागी असतील. सरपिराजीराव तलावाच्या माळावर होणाऱ्या शर्यती विनाकाठी व विनामोटारसायकल गाडी होतील. पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले, दीपक शिंदे, शिवाजीराव चौगले उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com