महावितरण अधिकाऱ्यांची बेफिकीरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण अधिकाऱ्यांची बेफिकीरी
महावितरण अधिकाऱ्यांची बेफिकीरी

महावितरण अधिकाऱ्यांची बेफिकीरी

sakal_logo
By

मुरगूडच्या महावितरण अधिकाऱ्यांची बेफिकीरी

मुरगूड : येथील महावितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची शेतीपंपाची चुकीची वीजबिले दुरुस्त करण्यासाठी व माफ करण्यासाठी शेतकऱ्यांना कार्यालयात येण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मुरगूड पंचक्रोशीतून अनेक शेतकरी कार्यालयात आले होते. तथापि संबंधित अधिकारी व कर्मचारी सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यालयात उपलब्ध होऊ शकले नाहीत. संबंधित अधिकारी मीटिंगसाठी गेल्याचे तेथील कर्मचारी सांगत होते. कार्यालयानेच अगोदर तारीख देऊनही अधिकारी वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे शेतकरी दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयात ताटकळत उभे होते. वीज बील माफ अथवा कमी होईल, या अपेक्षेने आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने आल्या पाऊली घरी परतावे लागले. शेतीची कामे बाजूला ठेवून मोठ्या अपेक्षेने आलेल्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला. यावेळी अॅड. दयानंद पाटील (नंद्याळ), नामदेव भराडे (मुरगूड), शिवाजी कळमकर, दीपक पाटील, संदीप पाटील, तुकाराम कळमकर (यमगे), बाबासो चौगले, आनंदा खतकर (भडगाव), एकनाथ पोवार (हळदवडे), युवराज म्हसवेकर (करंजिवणे), सागर पाटील (मळगे), किरण लोकरे व सागर आमणे (कापशी), संदीप पाटील, उत्तम आसवले आदी उपस्थित होते.
....

‘शाहू मिल्क अॅन्ड अॅग्रो’ च्या
विस्तारीकरण प्रकल्पाची आज पायाभरणी

सिद्धनेर्ली ःव्हन्नूर (ता. कागल) येथील श्री. छत्रपती शाहू मिल्क अॅन्ड अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत विस्तारीकरणासाठी मंजूर झालेल्या प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ गुरुवारी (ता.९)होणार आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व शाहू दूध संघाचे चेअरमन समरजितसिंह घाटगे व संघाच्या कार्यकारी संचालिका व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे या उभयंतांच्या शुभहस्ते शाहू दूध संघाच्या कार्यस्थळावर सकाळी अकरा वाजता हा पायाभरणी समारंभ होणार आहे. प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी प्रशांत मोहोड, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे, शाहू दूध संघाच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. या कार्यक्रमास सर्व सभासद, दुध उत्पादक शेतकरी, ग्राहक व हितचिंतक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शाहू दूध संघाच्या प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

...
वंदूर येथे हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात १२ बकऱ्या ठार

सिद्धनेर्लीः वंदूर (ता.कागल) येथे हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात १२ बकऱ्या ठार झाल्या तर बारा बकऱ्या जखमी झाल्या. त्यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . येथील सदाशिव माळकर यांच्या शेतामध्ये सुरेश गंगाराम गोरडे यांची बकरी गेले चार ते पाच दिवस खतासाठी बसवली आहेत. रात्रीच्या वेळी हिंस्त्र प्राण्यांनी बकऱ्यांच्या पिल्लांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बारा पिल्ले मृत झाली. तर अन्य दहा ते बारा पिल्ले जखमी झाली आहेत.


....
बोरवडेत गंजीला आग लागून नुकसान

बिद्री : बोरवडे ( ता.कागल) येथे गोठ्याला लागून ठेवलेल्या पिंजराच्या गंजीला अचानक आग लागल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तीन गाईंचे प्राण वाचले. बोरवडे येथील शिवाजी कोंडीबा कुंभार यांच्या घराजवळ पिंजर ठेवले होते. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक या गंजीला आग लागली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी कुंभार आणि त्यांचे कुटुंबीय शेताकडे गेले होते. शेजारील स्वप्नील जोंधळे हा विद्यार्थी दहावीचा पेपर देऊन दुपारी घरी आला असता, त्याला आग लागल्याचे लक्षात आले. त्याने आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलावले. साताप्पा जाधव, सुनील जोंधळे, विनायक कांबळे, अनिकेत चव्हाण, प्रमोद कांबळे, लखन रामाणे, तुषार फराकटे आणि अन्य लोकांनी घरातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काहींनी बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशमनला फोन करुन तत्काळ बोलावून घेतले. घटनास्थळी जमलेल्या तरुणांनी गोठ्याचे दरवाजे उघडून घरातील तीन गाईंना बाहेर काढत गाईंचे प्राण वाचवले. काही वेळानंतर अग्निशमन दलाने आग विझवली.
...