''त्या'' तरुणाचा मृतदेह ३१ तासानंतर सापडला.

''त्या'' तरुणाचा मृतदेह ३१ तासानंतर सापडला.

सोनगेच्या तरुणाचा मृतदेह
३१ तासानंतर सापडला

मुरगूड,ता.८ : कागल तालुक्यातील बस्तवडे येथील वेदगंगा नदीवरील जुन्या पुलाजवळ कुटुंबासह अंथरुण धुण्यासाठी गेलेल्या सोनगे ( ता.कागल) येथील संजय आनंदा तोरसे (वय ४५) या तरुणाचा मृतदेह आज ३१ तासानंतर सापडला.जीवरक्षक दिनकर कांबळे व गडहिंग्लजच्या पास रेस्क्यू फोर्सने अथक प्रयत्नाने मृतदेह शोधून काढला. काल सकाळी १० वाजता पत्नी, मुलांच्या डोळ्यादेखतच हा तरुण वाहून गेला होता.
संजय मूळचा खडकेवाडा येथील असून सध्या सोनगे येथे राहत होता. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वेदगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली होती.पुलाजवळ पाणीप्रवाह वेगवान होता. याठिकाणी भोवरा निर्माण झाल्याने संजयला पोहता येत असताना देखील त्या भोवऱ्यातून त्याला बाहेर येता आले नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत तो दिसेनासा झाला होता.
काल सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी सातपर्यंत वेदगंगा नदीत पाणबुडी व गडहिंग्लजच्या पास रेस्क्यू फोर्सने बोटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरु केले होते. पण अंधार झाल्याने शोधकार्य थांबले. आज सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा शोध घेण्यास सुरुवात झाली. संजयचा मृतदेह सापडताच त्याच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. संजय हा हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यात कर्मचारी होता. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com