शिंदेवाडीच्या उपसरपंचपदी सरिता पोवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदेवाडीच्या उपसरपंचपदी सरिता पोवार
शिंदेवाडीच्या उपसरपंचपदी सरिता पोवार

शिंदेवाडीच्या उपसरपंचपदी सरिता पोवार

sakal_logo
By

03553
शिंदेवाडी उपसरपंचपदी सरिता पोवार बिनविरोध
मुरगूड : शिंदेवाडी (ता. कागल ) येथील उपसरपंचपदी मंडलिक गटाच्या सरिता विलास पोवार यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच रेखा माळी निवडसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामपंचायतीत समरजीतसिंह घाटगे व खासदार संजय मंडलिक गटाची सत्ता आहे. सदस्य अजित मोरबाळे यांनी उपसरपंचपदासाठी सरिता पोवार यांचे नाव सुचवले; त्याला अविनाश गोसावी यांनी अनुमोदन दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तामामा खराडे, अजित मोरबाळे, रामेश्वरी खराडे, छाया शिंदे, आक्काताई वंदूरे यांच्यासह दगडू माळी, नामदेव शिंदे, रमेश माळी, ओंकार मोरबाळे, विलास पोवार, बबन वंदूरे, राहुल खराडे, सचिन शिंदे, विजय मोरबाळे उपस्थित होते. ग्रामसेवक एलिझा कांबळे यांनी आभार मानले.