
मुरगूडला वीर सावरकर गौरवयात्रा
03559
मुरगूडला वीर सावरकर गौरवयात्रा
मुरगूड : येथे कागल तालुक्यातील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे वीर सावरकर गौरवयात्रा काढली. काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात उपस्थित कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पदयात्रेस प्रारंभ झाला.यावेळी अमर रहे, अमर रहे, वीर सावरकर अमर रहे, राहुल गांधींचा धिक्कार असो, भाजप-शिवसेना युतीचा विजय असो, महाविकास आघाडीचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील मगदूम, सुधीर पाटोळे यांची भाषणे झाली. यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक डी. एस. पाटील, प्रताप पाटील, कागल बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, बाजीराव गोधडे,दत्तामामा खराडे, अमर सणगर,संजय चौगुले,अनंत फर्नांडिस, विजय राजगिरे, सुहास खराडे, अमर चौगुले, विशाल सूर्यवंशी, विलास गुरव आदी पदयात्रेत सहभागी झाले. संजय पाटील यांनी आभार मानले.